Sunday, April 28, 2024
घरमानिनीBeautyFish Pedicure खरचं सुरक्षित आहे का?

Fish Pedicure खरचं सुरक्षित आहे का?

Subscribe

आपण पायात चप्पल-बूट जरी घातले तरीही पाय अस्वच्छ होतात. अशातच ते स्वच्छ धुवावेत असे सांगितले जाते. अन्यथा पायांच्या नखांमध्ये घाण जमा होण्यासह डेड स्किन तयार होऊ लागते. ते स्वच्छ करण्यासाठी विविध उपाय केले जातात. अशातच सध्या फिश पेडीक्योर खासकरुन केले जाते. या प्रोसेसमध्ये तुमच्या पायावरची डेड स्किन निघते आणि पायाची त्वचा ही मऊ होते. फिश पेडीक्योरला इचिथियोथेरेपी असे सुद्धा म्हटले जाते. (Fish pedicure)

फिश पेडीक्योरमध्ये पाण्याने भरलेल्या एका बेसिन किंवा टबमध्ये पाय बुडवले जातात. त्यात Garra Rufa किंवा Doctor Fish टाकले जातात. हे मासे पायांचे तळवे, नखं यांच्यावर जमा झालेली डेड स्किन खातात. दहा-पंधरा मिनिटे पाय त्यात ठेवल्यानंतर ते काढले जातात. त्यानंतर पायांची नखं ट्रिम किंवा त्यांना शेप दिला जातो.

- Advertisement -

फिश पेडीक्योरमुळे होणारे नुकसान
-रक्तस्राव होऊ शकतो
रुफा माश्याला दात नसतात. त्यामुळे ते तुमच्या पायावरची डेड स्किन कुरतडतात. या माश्यांमुळे रक्तस्राव होत नाही. मात्र फिश पेडीक्योरसाठी कधीकधी रुफा ऐवजी साइप्रिनियन मॅक्रोस्टोमस माशाचा वापर केला जातो. या माशांना दात असतात. ते जेव्हा डेड स्किन कुरतडतात तेव्हा रक्तस्राव होण्याची शक्यता असते.

- Advertisement -

-इंन्फेक्शन होऊ शकते
एरोमोनास वेरोनी, एरोमोनस हाइड्रोफिला, माइकोबॅक्टेरियम मॅरिनम सारख्या फिशच्या माध्यमातून इन्फेक्शन होऊ शकते. पेडीक्योर दरम्यान बेसिन स्वच्छ करणे आव्हानात्मक आहे. असे केल्याने माशांना नुकसान पोहचू शकते. संक्रमण झाल्यास मधुमेह किंवा अन्य गंभीर आजार होऊ शकतात.

-फिश पेडीक्योर ऐवजी हे करा घरगुती उपाय
फिश पेडीक्योर पूर्णपणे सुरक्षित नाही. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी सुद्धा पेडीक्योर करु शकता. त्यासाठी एका गरम पाण्यात टबमध्ये पाय थोडावेळ ठेवावेत.त्यानंतर प्युमिस स्टोनच्या मदतीने तुम्ही ते स्वच्छ करु शकता. अथवा कॅलस रिमूवरचा सुद्धा वापर करुन पायांची स्वच्छता केली जाऊ शकते.


हेही वाचा- Monsoon: पावसाळ्यात अशी घ्या पायांची काळजी

- Advertisment -

Manini