Wednesday, April 17, 2024
घरमानिनीGardening Tips: बदलत्या वातावरणात अशी 'घ्या' रोपांची काळजी

Gardening Tips: बदलत्या वातावरणात अशी ‘घ्या’ रोपांची काळजी

Subscribe

बदलत्या वातावरणात जशी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो त्याच पद्धतीने रोपांची काळजी घेणेही महत्वाचे असते. जेणेकरून रोपे निरोगी राहतील आणि त्यांची चांगली वाढ होण्यास मदत मिळेल. अंगणातील झाडे असुदे की, तुमचे इंडोर रोपे या दोन्हींवर वातावरणाचा परिणाम होत असतो. पण, तुम्ही काही गार्डनिंग टिप्स लक्षात घेतल्यात तर, बदलत्या वातावरणातही तुम्हाला रोपांची काळजी घेणे अगदी सोपे जाते.

योग्य माती –
रोपे लावलेल्या मातीतील ओलावा टिकवून ठेवणे आणि आवश्यक असल्यास कंपोस्ट खताचा वापर करणे,रोपांच्या वाढीसाठी हे अत्यंत महत्वाचे असते. बदलत्या वातावरणात जर तापमान वाढले तर रोपांना अधिक खताची गरज भासू शकते. एक गोष्ट लक्षात घ्या, खत घालण्यापूर्वी मातीत पुरेसे पाणी घालून माती ओलसर करा.

- Advertisement -

पाणी –
जेव्हा वातावरणातील तापमान वाढते तेव्हा रोपांना जास्त पाणी लागते. त्यामुळे अशा वातावरणात रोपे कोरडी पडणार नाहीत याची काळजी घ्या. वेळोवेळी रोपांना पाणी द्या. पण, पाणी देताना त्याचे प्रमाण लक्षात घ्या. तुम्ही झाडांना सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा पाणी देऊ शकता.

- Advertisement -

छाटणी –
रोपे कायम निरोगी आणि आकर्षक असावीत असे वाटत असेल तर त्यांची नियमित छाटणी आणि देखभाल करणे आवश्यक असते. यासाठी रोपांमधील मृत, कोरडी पाने तुम्ही वेळोवेळी काढून टाकायला हवीत. एक लक्षात घ्या, छाटणी करताना स्वच्छ कात्रीचाच वापर करावा.

लागवड आणि सावली –
उन्हाळ्यात झाडे सुरक्षित ठेवण्यासाठी, सूर्यप्रकाशापासून त्यांचे रक्षण करणे आवश्यक असते. तीव्र प्रकाशामुळे रोपे कोमेजू शकतात किंवा पाने सुकू शकतात. अशावेळी कडक उन्हाळ्यात कमी प्रकाश मिळेल अशा जागी रोपे ठेवायला हवीत.

रोग आणि कीड व्यवस्थापन –
रोगापासून रोपांचे अथवा अंगणातील झाडांचे संरक्षण करण्यासाठी त्यांची नियमित तपासणी करणे आवश्यक असते. तसेच गरज भासल्यास त्याच्यावर उपचार देखील करायला हवेत. यासाठी तुम्हाला कडुलिंबाच्या तेलाची फवारणी करणे उत्तम ऑप्शन आहे. यासह तुम्ही कीटकांपासून संरक्षणासाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर करू शकता. आवश्यक असल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर देखील तुम्ही करू शकता.

ह्युमिडीफायर-
उन्हाळ्यात हवेत कोरडेपणा येण्याची शक्यता अधिक असते. याचा परिणाम झाडांवर होत असतो. अशा वेळी ह्युमिडीफायर तुम्ही वापर शकता. त्यामुळे हवेत ओलावा निर्माण होतो आणि झाडांची पानेही खराब होत नाही. वनस्पतींना त्यांचे पोषक आवश्यक असते. यासाठी नियमित खतांचा वापर केल्याने झाडांची वाढ निरोगीरीत्या होते.

 

 


हेही वाचा : ब्लँकेट्स, चादरींना कुबट वास येतोय? वापरा ‘या’ सोप्या टिप्स

 

- Advertisment -

Manini