Saturday, April 27, 2024
घरमानिनीझाडांना फुलंच येत नाहीत? कुंडीत टाका या गोष्टी

झाडांना फुलंच येत नाहीत? कुंडीत टाका या गोष्टी

Subscribe

अनेक लोक तक्रार करतात की त्यांच्या लागवड केलेल्या रोपांना फुले येत नाहीत. विशेषत: ज्या झाडांना चांगली फुले येतात ती फुलणे थांबवतात. त्यामुळे बागेचे सौंदर्य कमी होते. याशिवाय हे असं का होतंय याचंही टेन्शन वाढतं.  लोक वनस्पतींना फुले यावीत म्हणून अनेक उपाय करतात, परंतु काहीच काम करत नाही. शेवटी ते रोप काढावे लागते. पण हाच एकमेव उपाय नाही. झाडे लावण्यासाठी योग्य जागा असणे पुरेसे नाही, तर त्यांची योग्य काळजी घेणेही आवश्यक आहे. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका गोष्टीबद्दल सांगणार आहोत, ज्याला तुम्ही भांड्यात टाकताच तुमचे रोप फुलांनी बहरून जाईल. चला तर मग जाणून घेऊया या ट्रिकबद्दल.

संत्र्याची साले कामी येतील
संत्री आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. अनेकदा आपण साल काढून संत्री खातो. पण आतापासून साले फेकून देऊ नका, तर त्याचा उपयोग झाडांन फुले यावीत म्हणून करता येईल. जेव्हाही फुल झाडांना कळ्या यायला सुरूवात होईल तेव्हा झाडांमध्ये जास्त पाणी घालू नका. कारण जास्त पाण्यामुळे पानांना जास्त पोषण मिळेल. फुलं उगवण्याऐवजी झाड आपली एनर्जी पानं वाढवण्यात लावतात. म्हणूनच पावसाळ्याच्या दिवसांत झाडं भरपूर वाढतात पण फुलं येत नाहीत. पण अजिबात पाणी न घालण्याची चूक करू नका. मातीमध्ये थोडं मॉईश्चर राहण्यासाठी थोड्याफार प्रमाणात पाणी घालायलाच हवं पण जास्त पाणी घालू नका.

- Advertisement -

गुलाब-जास्वंदाच्या झाडासाठी 5 रूपयांचा उपाय
गुलाब आणि जास्वंदासाठी चहा पावडरचे फर्टिलायजर परिणामकारक ठरते. चहाच्या पानांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे फुलांची चांगली वाढते आणि त्यांचा रंगही दाट होतो. चहाचं पाणी उकळून चहा पावडर एका जागी साठवून ठेवा. चहाचे पाणी थंड झाल्यानंतर तुम्ही झाडांसाठी वापरू शकता. चहा पावडर थंड झाल्यानंतर झाडांमध्ये वापरा

सैंधव मीठ वापरा
रॉक सॉल्ट म्हणजे एप्सम सॉल्ट. यामध्ये मॅग्नेशियम आणि सल्फरसारखे पोषक घटक असतात. जे वनस्पतीसाठी खूपच फायदेशीर असतात. त्यामुळे तुम्ही याचा वापर झाडांना फुले येण्यासाठी नक्की करु शकता. यामुळे झाडांना पोषक घटक मिळण्यास मदत होते आणि झाड अधिक झपाट्याने वाढते. रॉक सॉल्टच्या वापराने झाडे हिरवीगार राहण्यास मदत होते. याचा वापर करताना हे रॉक सॉल्ट थेट मातीमध्ये मिसळावे. हे मातीत मिसळल्यामुळे त्याची चांगली वाढ होण्यास मदत होते.

- Advertisement -

उन्हाळ्याचे दिवस वगळता बाकी इतरवेळी हलकं ऊन पडलेलं असताना जास्वंद आणि गुलाब ही दोन्ही झाडं उन्हात ठेवू शकता. या झाडांचा खुराक जास्त असल्यामुळे त्यांच्या योग्य फंक्शनसाठी उन्हाची आवश्यकता असते. म्हणून या झाडांना सावलीत ठेवणं टाळा.

- Advertisment -

Manini