Tuesday, March 25, 2025
27 C
Mumbai
HomeफोटोगॅलरीPHOTO : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

PHOTO : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Subscribe

राज्यविधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे आजपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सरकार विरोधात आंदोलन केले आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक झाले.

‘फसवणूक नको आरक्षण द्या’ ‘महायुती सरकारचा जागर, आरक्षणाचे रोज नवीन गाजर’ म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. विरोधक विधिमंडळाच्या पायऱ्यांव घोषणाबाजी करत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनात शिंदे आण राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधिमंडळात प्रवेश केल्याचे चित्र आज दिसून आले.

 

याप्रसंगी विरोधकांनी पायऱ्यांवर धिक्कार असो, मराठा समाजाच्या जीवाशी खेळणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मराठा – ओबीसींची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत सरकार विरोधात निदर्शने केली.

विधान सभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केले. यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेच थोरात, विधानसभेचे विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, अमीन पटेल, अमित देशमुख, धीरज देशमुख,जितेश अंतापुरकर  आणि भाई जगताप दिसत आहे.

 

राजेश राठोड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधिमंडळ गटनेते अजय चौधरी,राजन साळवी, नरेंद्र दराडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गटाचे) अनिल देशमुख, सुनील भुसारा , विनोद निकोले यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षाच्या आमदारांनी मराठा आणि ओबीसी समाजाची आरक्षणाच्या मुद्द्यावर फसवणूक करणाऱ्या सरकारविरोधात घोषणा लिहिलेले फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

अर्थसंकल्पीय अधिवेशन अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची धमाकेदार एंट्री घेतल्याचे पाहायला मिळाले.