Wednesday, May 8, 2024
घरमानिनीगॅस-स्टोवचे लाइटर अशा पद्धतीने करा झटपट स्वच्छ

गॅस-स्टोवचे लाइटर अशा पद्धतीने करा झटपट स्वच्छ

Subscribe

कुकिंग केल्यानंतर स्वच्छता करणे हे फार मुश्किलचे काम असते. गॅस स्टोव पेटवण्यासाठी बहुतांश लोक लाइटरचा वापर करतात. मात्र गॅस स्टोवचे लाइटर स्वच्छ करणे अत्यंत मुश्किल असते. अशातच आम्ही तुम्हाला हे लाइटर झटपट कसे स्वच्छ करायचे याच बद्दलच्या काही खास टीप्स सांगणार आहोत.

-तांदळाच्या पाण्याचा वापर

- Advertisement -


लाइटर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही सर्वात प्रथम १ पाउच ईनो मध्ये १ चमचा तांदळाचे पाणी घ्यावे. त्यानंतर ही पेस्ट स्क्रबरच्या मदतीने लाइटवर लावा. १५ मिनिटानंतर ही पेस्ट एका कापडाने स्वच्छ करा. यामुळे लाइटर स्वच्छ होईल.

-टुथपेस्टने स्वच्छ करा

- Advertisement -


खरंतर टुथपेस्ट आपल्याला काही गोष्टी स्वच्छ करण्यासाठी उपयोगी पडते. टुथपेस्टच्या माध्यमातून तुम्ही गॅस-स्टोवचे लाइटर ही स्वच्छ करु शकता. त्यानंतर एका सुक्या फडक्याने त्यावर लावलेली टुथपेस्ट स्वच्छ करा. यामुळे लाइटवरील काळे डाग निघून जातील.

-लिंबूचे पाणी


तुम्ही लिंबूचे पाणी घ्या. त्याआधी तुमचे लाइटर एका सुक्या कपड्याने स्वच्छ करा. आता लाइटरवर ते पाणी लावून स्क्रबच्या मदतीने घासा. त्यानंतर पुन्हा ते लाइटर स्वच्छ करा. यावेळी लक्षात ठेवा पाणी लाइटरमध्ये जाऊ देऊ नका.

 


हेही वाचा: Cooking Tips : लोखंडी कढईत नका शिजवू अन्न,आरोग्यावर होतील परिणाम

- Advertisment -

Manini