घरमहाराष्ट्र"मविआच्या भविष्याबाबत सांगता येणार नाही", शरद पवारांकडून मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत?

“मविआच्या भविष्याबाबत सांगता येणार नाही”, शरद पवारांकडून मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत?

Subscribe

शरद पवार यांच्या या विधानावरून आघाडी एकत्रीत लढेल की फूट पडेल या चर्चांना आणखी वेग मिळाला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने २०१९ ला तीन वेगवेगळे पक्ष एकत्र आले. अन् नवी आघाडी स्थापन झाली. शिवसेना, राष्ट्रवादी अन् कॉंग्रेस हे तीन वेगवेगळी वैचारिक बैठक असणारे पक्ष सत्तेत आले. त्यानंतर केवळ शिवसेनेतील आमदारांच्या बंडामुळे ही आघाडी कोलमडली आणि शिंदे फडणवीस सरकार आलं. महाविकास आघाडीत अनैसर्गिक युतीचं कारण देत शिवसेनेतील आमदारांनी बंड पुकारलं. या बंडाच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील अस्वस्थता सर्वांसमोर आली आणि ही आघाडी किती टिकणार यावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. या चर्चांवर आता शरद पवार यांनी महत्वाचं विधान केलंय. त्यांच्या या विधानावरून आघाडी एकत्रीत लढेल की फूट पडेल या चर्चांना आणखी वेग मिळाला.

एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना शरद पवार यांनी ही सूचक विधान केलंय. महाविकास आघाडीच्या भविष्याबाबत आज सांगता येणार नाही असं यावेळी शरद पवार म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा: ‘चोर आले पन्नास खोके घेऊन’ गाण्याचा रॅपर कुठे आहे? जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट

यापुढे बोलताना शरद पवार पुढे म्हणाले की, “मविआच्या भविष्याबाबत आज सांगता येणार नाही. कोण कशी भूमिका घेईल हे आज सांगता येणार नाही. हे तीन पक्ष आहेत. त्यांच्यातील सहकारी आणि नेतृत्वाची आता मानसिकता एकत्रित काम करण्याची आहे. जोपर्यंत ही मानसिकता आहे तोपर्यंत मला काळजी नाही. उद्या ही मानसिकता सोडून काहीतरी वेगळं करायचा असा कुणी निर्णय घेतला तर हा त्यांचा निर्णय असेल. तिन्ही पक्षांचा असणार नाही.”

- Advertisement -

हे ही वाचा: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीसंबंधी सुनावणी आता ४ मेला

यापूर्वी अनेक कार्यक्रमात शरद पवार यांनी मविआच्या एकत्रित येण्याबाबत सूचक विधान केलं होतं. “आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रित पावलं टाकावी हा आमचा प्रयत्न आहे. काही राजकीय पक्षांनाही या आघाडीत सामवून घेण्याची इच्छा आहे. रिपब्लिकन पक्षातील काही गटांचा आघाडीत समावेश करावा, अशी इच्छा आहे.”, असं यापूर्वी शरद पवार म्हणाले होते.

हे ही वाचा: बाबरी पाडली तेव्हा उद्धव कुठे होते? त्यांना यावर बोलण्याचा अधिकार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्यानंतर आज मुलाखतीत शरद पवारांनी दिलेल्या या मोठ्या विधानामुळे मविआच्या भविष्यातील संभाव्य घडामोडींवर चर्चा सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीतील मतभेद समोर येताना दिसत असताना शरद पवारांचं हे वक्तव्य पाहता आघाडीची वज्रमुठ सैल होतेय की काय अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -