Thursday, December 7, 2023
घरमानिनीBeautyएक्सरसाइजनंतर केस का धुतले पाहिजेत?

एक्सरसाइजनंतर केस का धुतले पाहिजेत?

Subscribe

व्यायाम केल्याने आपण तंदुरुस्त राहतो. मात्र जेव्हा आपण जिमला जातो तेव्हा आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जसे की, जिमसाठी घातले जाणारे कपडे, केसांची काळजी. अशातच तुमचे केस लांब असतील आणि तुम्ही दररोज व्यायाम करत असाल तर केस धुणे अत्यंत गरजेचे आहे. कारण केसांमध्ये घाम आल्याने ते तेलकट होतात. त्यामुळे ते धुतले पाहिजेत. अन्यथा केसांसंबंधित काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात.

डर्मेटोलॉडिजस्टनुसार फ्रिज आणि ड्राय हेअरच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी वर्कआउट दररोज केस धुणे गरजेचे नाही. मात्र स्वच्छेतेच्या दृष्टीकोनातून पाहिले असता ते धुणे गरजेचे आहे. कारण केस धुतले नाहीत तर बॅक्टेरिया आणि फंगस तयार होऊ शकते. त्यामुळे असा सल्ला दिला जातो की, केसांना माइल्ड शँम्पू आणि कंडीशनरने धुवावे. जर तुम्ही दररोज केस धुत असाल तर सल्फेट फ्री शँम्पूचा वापर करावा.

- Advertisement -

Tips for Working Out Without Ruining Bangs and Other Hairstyles

-ड्राय शँम्पूचा वापर
जुन्या काळात घामाने भिजलेले केस सुकवण्यासाटी बेबी पावडरचा वापर केला जायचा. मात्र काहीवेळेस केसांचा रंग डार्क असल्याने बेबी पावडरचा वापर करणे मुश्किल व्हायचे. त्यामुळेच ड्राय शँम्पू तयार करण्यात आले. अशातच ड्राय शँम्पूचा वापर तुम्ही करू शकता.

- Advertisement -

-स्वेट बँन्ड घाला
स्वेट बँन्डचा तुम्ही वापर करू शकता. काही हेडबँन्ड ही मिळतात त्याचा ही वापर तुम्ही करू शकता. याचा वापर केल्याने तुम्हाला केसात येणारा अतिरिक्त घाम कमी होऊ शकतो.

-योग्य ब्रशचा वापर करा
जर तुम्ही व्यायामानंतर अंघोळ करत नसाल तर योग्य उपकरणांचा वापर केला पाहिजे जे तुमच्या केसांसाठी बेस्ट आहेत. वर्कआउट नंतर केस विंचरण्यासाठी तुम्ही नायलॉन हेअर ब्रशचा वापर केला पाहिजे. तो तुमच्या केसांना नुकसान पोहचवू शकत नाही.

-केवळ पाण्याने धुवा केस
जर तुम्हाला केस स्वच्छ करायचे असतील किंवा धुवायचे असतील तर केवळ पाण्याचा वापर करू शकता. पाण्यात तुम्ही लिव-इन कंटीशनर मिक्स करू शकता.


हेही वाचा- झोपण्यापूर्वी हेड मसाज करण्याचे फायदे

 

- Advertisment -

Manini