मुंबईच्या मुलुंड वेस्टमध्ये एका सोसायटीमध्ये मराठी महिलेला घर नाकारणाऱ्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. तृप्ती देवरुखकर असं या महिलेचं नाव असून त्यांनी या संदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. या सर्व प्रकारानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या सोसायटीत जाऊन संबंधित पदाधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर त्यांनी तृप्ती देवरुखकर यांची माफी मागितली. मात्र, आता या मुद्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज यांनी आपल्या ठाकरे शैलीत एक पोस्ट फेसबूकवर शेअर केली आहे. यात त्यांनी म्हटलंय की असा प्रकार जर पुन्हा महाराष्ट्रात घडला तर गालावर वळ उठतील, असं म्हणत त्यांनी घडल्या प्रकाराचा खरपूस समाचार घेतला आहे. (Mulund Raj s Thackeray style news on the matter of denying a house to a Marathi woman)
नेमकं राज ठाकरे काय म्हणाले?

मनसेचं ट्वीट आदित्य ठाकरेंना केलं टार्गेट
मराठी माणसाला घर नाकारल्याप्रकरणी मनसेनं ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. आदित्य ठाकरेंनी 2019ची विधानसभा निवडणूक लढवताना वरळीत वेगवेगळ्या भाषेत कशी आहे वरळी? असा प्रश्न विचारणे बॅनर्स लावले होते. त्यात केम छो वरली? असाही बॅनर होता. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना टार्गेट करत टोला लगावला.
संदीप देशपांडे म्हणाले की,त केम छो वरळी? होर्डिंग लावणाऱ्या लोकांमुळेच या लोकांना एवढा माज आणि हिंमत आली आहे की महाराष्ट्रात मराठी माणसाला घर देणार नाही म्हणतात. यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, असं सणसणीत ट्वीट देशपांडे यांनी केलं आहे.
"केम छो वरळी "होर्डिंग लावणाऱ्या लोकांमुळेच ह्या लोकांना एवढा माज आणि हिम्मत आली आहे की महाराष्ट्रात मराठी माणसाला घर देणार नाही म्हटतात ह्यांचा माज उतरवल्या शिवाय राहणार नाही जय मनसे जय राज साहेब
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 28, 2023