Tuesday, April 30, 2024
घरमानिनीFashionHair Serum : खोबरेल तेल अन् एलोवेरा जेलने तयार करा हेअर सिरम

Hair Serum : खोबरेल तेल अन् एलोवेरा जेलने तयार करा हेअर सिरम

Subscribe

बदलते ऋतू आणि खराब जीवनशैलीमुळे केस मुळापासून कमकुवत होतात. केस झपाट्याने गळल्यामुळे तणाव वाढू लागतो आणि जास्त केस गळायला लागतात. केसांची काळजी घेण्यासाठी ऑयलिंग, शैम्पू आणि कंडीशनर इतर वस्तूंचा वापर केला जातो. पण कोरफड आणि खोबरेल तेल दोन्ही आपल्या त्वचेसाठी तसेच केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. यातील जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स केसांना होणारे नुकसान टाळतात आणि केसांची वाढ होण्यास मदत करतात. तुम्हीही घरच्या घरी खोबरेल तेल आणि एलोवेरा जेल वापरून केसांसाठी सिरम बनवू शकता.

 घरीच नैसर्गिक सिरम बनवा :

साहित्य

  • 1/2 कप फ्रेश एलोवेरा जेल
  • 1 टेबलस्पून खोबरेल तेल
  • 1 टेबलस्पून व्हिटॅमिन ई तेल
  • 1 टेबलस्पून आर्गन ऑइल

सीरम तयार करा :

  • फ्रेश कोरफडीचे जेल घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक करा जेणेकरून ते गुळगुळीत होईल.
  •  एका भांड्यात एलोवेरा जेल, खोबरेल तेल, व्हिटॅमिन ई आणि आर्गन ऑइल मिक्स करा.
  •  यानंतर त्यामध्ये तुमचे आवडते आवश्यक तेल मिसळा. सर्वकाही चांगले मिसळून घ्या.
  • हे होममेड हेअर सीरम एका स्वच्छ बाटलीत ठेवा. आपल्याला ते सूर्यप्रकाशापासून दूर थंड आणि कोरड्या जागी ठेवावे लागेल.

 सिरमचा वापर :

  • तेल लावल्यानंतर केसांना शॅम्पू आणि कंडिशनर वापरा.
  • यानंतर थोडेसे हेअर सीरम घेऊन केसांना लावा, विशेषतः केसांच्या लांबीवर.
  •  केसांना हलक्या हातांनी मसाज करा.
  • केस खूप सुंदर दिसतील.

खोबरेल तेल आणि एलोवेरा जेल सिरमचे फायदे :

 मॉइस्चराइझ 
कोरड्या केसांना मॉइस्चराइझ करण्यासाठी तुम्ही हे सीरम वापरू शकता. हे केसांना चांगल्या आणि नैसर्गिक पद्धतीने पोषण आणि हायड्रेट करते. त्यामुळे केस कोरडे होत नाहीत.

- Advertisement -

 कोंडा दूर
कोरफड तुमच्या टाळूवरील मृत थर काढून टाकण्यास मदत करते. हे नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करते आणि टाळूवर साचलेली सर्व घाण सहजपणे काढून टाकते.

केस गळणे कमी
कोरफड केसांची मुळे मजबूत करते ज्यामुळे केस गळणे सहज टाळता येते. तसेच केस तुटण्यापासून वाचवते.

- Advertisement -

 केस लांब
कोरफड केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते आणि केसांच्या वाढीस गती देते. कोरफडमध्ये असलेले आवश्यक खनिजे आणि एन्झाईम्स केसांच्या वाढीला गती देतात ज्यामुळे केस लांब होतात.

बुरशीजन्य संसर्गापासून संरक्षण
कोरफडीमध्ये अँटीफंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे टाळूवरील खाज आणि जळजळ दूर करण्यासाठी काम करतात.

हेही वाचा : घरच्या घरी करा पार्लरसारखे पेडीक्युअर मेडिक्युअर

_________________________________________________________________

Edited By : Nikita Shinde

- Advertisment -

Manini