Monday, April 29, 2024
घरमानिनीBeautyउन्हाळ्यात केसांना तेल लावताय ना? नाहीतर...

उन्हाळ्यात केसांना तेल लावताय ना? नाहीतर…

Subscribe

उन्हाळ्याच्या हंगामात स्काल्पमधून जास्त प्रमाणात घाम येतो, ज्यामुळे केस चिकट होण्याची समस्या प्रकर्षाने जाणवते. हे पाहून अनेक महिलांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की, उन्हाळ्यात हेअर ऑइल वापरायचे की नाही? साधारणतः हेअर ऑइल केसांच्या निरोगी आरोग्यासाठी वापरले जाते. अशा परिस्थितीत हेअर ऑइल वापरण्याच्या मुद्द्यावरून गोंधळ होणे सामान्य आहे.

उन्हाळ्यात केसांना तेल लावल्यास केसांच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात. केस आणि स्काल्प नैसर्गिक तेल तयार करते. जेणेकरून केस खराब होत नाही. उन्हाळ्यात घाम येण्याची समस्या प्रकर्षाने जाणवते. अशावेळी स्काल्प कोरडे पडण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात खास करून तेलाच्या साहाय्याने केसांना मालिश करण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र केसांना तेल लावणे म्हणजे प्रत्येकवेळी केसांना भरभरून तेल लावण्याची गरज नाही हेही लक्षात घ्या. अशावेळी उन्हाळ्यात केस अधिक चिकट होत असतील तर केस धुण्याच्या १ दिवस आधी कोणत्याही तेलाने डोक्याची मालिश करा.

- Advertisement -

केसांसाठी कोणते तेल वापराल ?

बदाम तेल – जर केस गळतीच्या समस्येने त्रस्त असाल तर बदामाचे तेल फायदेशीर ठरेल. बदामाच्या तेलात पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन इ असते. व्हिटॅमिन इ केसांसाठी फायदेशीर ठरते. बदामाचे तेल तुम्ही नियमित केसांना लावल्यास केसांचे वाढ होण्याचे प्रमाण वाढते.

- Advertisement -

खोबरेल तेल – वर्षानुवर्षे केसांसाठी खोबरेल तेल वापरण्यात येते. उन्हाळ्यात तुम्ही केस धुण्याआधी केसांना अवश्य खोबरेल तेल लावा. याने केसांवर एक प्रोटेक्ट लेयर तयार होईल आणि सनलाइटपासून केसांचे संरक्षण होईल. खोबरेल तेलाचे काही थेम्ब हातावर चोळून घ्या आणि नंतर केसांना मालिश करा.

ऑलीव्ह ऑइल – ऑलिव्ह ऑइल सेन्सिटिव्ह केसांसाठी फायदेशीर असते. ऑलीव्ह ऑइलमुळे कोणतेच केमिकल रिअक्शन होत नाही, त्यामुळे ऑलीव्ह ऑइल सेन्सिटिव्ह केसांसाठी हे अधिक प्रभावी मानले जाते. ऑलीव्ह ऑइल लाइटवेट असते त्यामुळे याने उन्हाळ्यात केस चिकट होत नाही. यासोबतच ऑलीव्ह ऑइलमध्ये दाहक- विरोधी गुणधर्म असतो ज्याने केस मजबूत होतात.

जोजोबा ऑइल – जोजोबा तेलात क्लिंझिंग क्षमता असते, ज्यामुळे ते शॅम्पू आणि कंडिशनर या दोन्हीचे कार्य करते. उन्हाळ्यासाठी केसांना कोणते तेल वापरायचे या प्रश्नाच उत्तर हवे असेल तर तुमचे उत्तर आहे जोजोबा ऑइल. जोजोबा ऑइलमुळे कोणतीच ऍलर्जी होत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात याचा नियमित वापर केल्यास केस निरोगी राहतात.

 

 

 

 

 


हेही पहा : उन्हाळ्यात रोज दही खाता ?

 

- Advertisment -

Manini