Thursday, May 16, 2024
घरमानिनीHealthतुमच्या शरिरात दररोज जाताहेत 'हे' टॉक्सीन

तुमच्या शरिरात दररोज जाताहेत ‘हे’ टॉक्सीन

Subscribe

शरिरात होणाऱ्या काही आजारांचे कारण म्हणजे हार्मोन असंतुलित होणे. असे झाल्याने काही समस्या होतात त्यापैकीच एक म्हणजे पीसीओडी. दररोज आपल्या शरिरात असे काही टॉक्सीन पोहचतात जे असंतुलित हार्मोनसाठी कारणीभूत ठरू शकतात. या टॉक्सीनच्या कारणास्तव काही हेल्थ समस्या ही निर्माण होतात. अज्ञातपणे आपण काही गोष्टी आपल्या रुटीनमध्ये फॉलो करतो त्यामुळे ही आपल्या शरिराला नुकसान पोहचू शकते. तुम्हाला माहितेय का, ज्या रुम फ्रेशनरला आपण घरात सुगंध येण्यासाठी वापर करतो त्यामुळे इनफर्टिलिटीची समस्या होऊ शकते. तर असेच पुढील काही टॉक्सीन जे तुमच्या शरिरात दररोज जातात त्यापासून आताच दूर व्हा.

-प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करू नका
सर्वच घरांमध्ये सामान ठेवण्यासाठी किंवा पाणी भरण्यासाठी प्लास्टिकच्या बॉटल आणि कंटेनर्सचा वापर केला जातो. यामध्ये काही घातक रसायन असतात जे नैसर्गिक रुपात आढळणाऱ्या एस्ट्रोजनला डिस्टर्ब करतात आणि एंडोक्राइन सिस्टिमध्ये चढ-उताराचे कारण ठरू शकते. याच कारणास्तव इनफर्टिलिटी, लठ्ठपणा, मधुमेह आणि ब्रेस्ट कँन्सर होण्याची धोका वाढू शकतो. प्लास्टिक कंटेनर्स ऐवजी तुम्ही स्टील, ग्लास किंवा कॉपर कंटेनर्स किंवा बॉटलचा वापर करू शकता.

- Advertisement -

रुम फ्रेशनर्समुळे हार्मोन होतात असंतुलित
नेहमीच आपण घरात आणि गाड्यांमध्ये सुगंध येण्यासाठी एअर फ्रेशनर्सचा वापर करतात. यामध्ये फटालेट्स असतात. जे एंडोक्राइन सिस्टिमला डिस्टर्ब करतात. यामुळे शरिरातील हार्मोनल स्तर बिघडतो. अशातच एलर्जी, अस्थमा आणि डोकेदुखी होऊ शकते. त्याऐवजी तुम्ही मेणबत्ती आणि अगरबत्तीचा वापर करू शकता.

-ग्रोसरी आणि अन्य बिल्समुळे आरोग्याला नुकसान
प्रत्येक घरात नेहमीच राशन आणि अन्य गोष्टींची बिल एकत्रित करुन ठेवली जातात. मात्र तुम्हाला माहितेय का, यामुळे ब्लड प्रेशर, मधुमेह आणि हृदयासंबंधित आजार होऊ शकतात. त्याऐवजी तुम्ही ई-बिल्सचा वापर करू शकता.

- Advertisement -

हेही वाचा- व्हेजिटेरियन लोकांना असतो हिप फ्रॅक्चरचा धोका

- Advertisment -

Manini