Holi 2023 : रंगपंचमीला तुमच्या राशीनुसार वापरा ‘हे’ रंग; वाढेल यश, मिळेल कीर्ती

हिंदू-धर्म ग्रंथातही रंगांना विशेष महत्त्व आहे.रंगांशिवाय आपण आपल्या सुंदर आयुष्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही.

Holi Festival in India holi horoscope 2022

रंगांचे आपल्या आयुष्यात असाधारण महत्त्व आहे. रंगांशिवाय आपण सुंदर आयुष्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. रंग आपल्याला सकारात्मक उर्जा देतात, वेगवेगळ्या रंगांमार्फत आपल्याला प्रत्येक रंगाची उर्जा भेटते.

लाल रंगाचं महत्त्व

लाल रंग हा मंगळ ग्रहाचा प्रतीक आहे, त्यामुळे या रंगाच्या वापराने मंगळ ग्रह मजबूत होतो. लाल रंग आपल्याला उर्जा, उत्साह, शक्ती यांसारखे गुण प्रदान करतो. हिंदू धर्मात लाल रंगाला अत्यंत शुभ मानलं जातं. रंगपंचमीच्या दिवशी लाल रंगाने रंगपंचमी खेळल्याने आरोग्य आणि प्रतिष्ठा वाढते.

हिरव्या रंगाच महत्त्व

हिरवा रंग बुध ग्रहाचे प्रतीक आहे. या रंगाच्या वापराने बुध ग्रह मजबूत होऊन निर्णय क्षमता, बुद्धीमत्ता वाढते. हिरवा रंग प्रगती, समृद्धी, आनंद यांचे प्रतिनिधित्व करतो.तुम्ही तुमचे प्रेम संबंध दृढ करण्यासाठी हिरव्या रंगाचा वापर करू शकता. . रंगपंचमीच्या दिवशी हिरव्या रंगाने रंगपंचमी खेळल्याने जीवनात शांती, समृद्धी येते.

पिवळ्या रंगाच महत्त्व

पिवळा रंग गुरू ग्रहाचे प्रतीक आहे. या रंगाच्या वापराने गुरु ग्रह मजबूत होतो. भगवान श्रीकृष्णाला ही पिवळा रंग खूप आवडतो. या रंगाच्या वापराने यश , किर्ती वाढते. रंगपंचमीच्या दिवशी पिवळ्या रंगाने रंगपंचमी खेळल्याने प्रेम , सौंदर्य , आनंद वाढतो.

गुलाबी रंगाचं महत्त्व

 

गुलाबी रंग शुक्र ग्रहाचे प्रतीक आहे. या रंगाच्या वापराने शुक्र मजबूत होतो. रंगपंचमीच्या दिवशी गुलाबी रंगाने रंगपंचमी खेळल्याने तुमचे आणि तुमच्या जोडीदारासोबतचे नाते घट्ट होते. या रंगाच्या वापराने आयुष्यात प्रेम वाढते.

निळ्या रंगाच महत्त्व

निळा रंग शनिदेवाचे प्रतीक आहे. या रंगाच्या वापराने शनि ग्रह मजबूत होतो. निळा रंगाने आत्मबळ मजबूत होते. रंगपंचमीच्या दिवशी निळ्या रंगाने रंगपंचमी खेळल्याने मनातील भीती कमी होते, त्याबरोबरंचं आत्मबळ मजबूत होते.

केशरी रंगाच महत्त्व

केशरी रंगाने सूर्य ग्रह मजबूत होते, ज्यामुळे आयुष्यात मान-सन्मान, प्रतिष्ठा , गौरव प्राप्त होतो. केशरी रंग अग्नीचे सुद्धा प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे आयुष्यातील अंधकार दूर होतो. रंगपंचमीच्या दिवशी केशरी रंगाने रंगपंचमी खेळल्याने आचार- विचार सुधारतात आणि आयुष्यात सकारात्मकता येते.

राशीनुसार खेळा हे रंग

मेष

तुमचा शुभ रंग लाल आणि केशरी आहे, या रंगामुळे तुमच्यातला उत्साह वाढेल.

वृषभ

तुमचा शुभ रंग गुलाबी आहे, यामुळे तुमचे प्रेम संबंध दृढ होतील.

मिथुन

तुमचा शुभ रंग हिरवा आहे, या रंगाच्या वापराने तुमच्या आयुष्यात सुख , समृद्धी येईल.

कर्क

तुमचा शुभ रंग क्रीम आहे, या या रंगाच्या वापराने तुमची मानसिक शक्ती वाढेल.

सिंह

तुमचा शुभ रंग केशरी आहे, या रंगाच्या वापराने तुमची प्रतिष्ठा वाढेल.

कन्या

तुमचा शुभ रंग गडद हिरवा आहे, या रंगाच्या वापराने तुमचा ताण-तणाव कमी होईल.

तूळ

तुमचा शुभ रंग गुलाबी आहे, गुलाबी रंग तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आहे.

वृश्चिक

तुमचा शुभ रंग लाल आणि केशरी आहे, या रंगामुळे तुम्ही दिवसभर उर्जावान रहाल.

धनू

तुमचा शुभ रंग पिवळा आहे, या रंगाच्या वापराने तुमची यश,किर्ती वाढेल.

मकर

तुमचा शुभ रंग निळा आहे, या रंगाचा वापर तुमच्यासाठी शुभ आहे.

कुंभ

तुमचा शुभ रंग निळा आहे, या रंगाचा वापराने तुमचे आत्मबळ वाढेल.

मीन

तुमचा शुभ रंग पिवळा आहे, या रंगाच्या वापराने तुमचे आध्यात्मिक विचार वाढतील.


हेही वाचा : पांंढऱ्या केसांमुळे त्रस्त असाल तर, तुळस आणि आवळ्याचे हे उपाय नक्की करून बघा