Saturday, September 30, 2023
घर मानिनी Beauty घरच्या घरी असे बनवा एलोवेरा जेल मेकअप क्लींजर

घरच्या घरी असे बनवा एलोवेरा जेल मेकअप क्लींजर

Subscribe

चेहऱ्यावर एलोवेरा जेलचा वापर केला जातो. याचा वापर केल्याने त्वचेला काही प्रकारचे फायदे होतात. आपल्या सर्वांनाच मेकअप करायला आवडतो. मेकअपमुळे आपल्या चेहऱ्यावरचे फिचर्स अधिक खुलून दिसतात. मात्र अधिक मेकअप आपल्या स्किनसाठी नुकसानकारक ही ठरू शकतो. मेकअप केल्याने त्वचेवर पिंपल्स ही येऊ शकतात. त्यामुळे नेहमीच सांगितले जाते की, मेकअप हा व्यवस्थिती काढला पाहिजे. त्यासाठी तुम्ही घरच्या घरी एलोवेरा जेल मेकअप क्लींजर कसे तयार कराल याच बद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात.(Home made aloe vera gel makeup cleanser)

घरच्या घरी असे बनवा जेल

- Advertisement -


बाजारात एलोवेरा जेल मिळते. पण तुम्ही ते खरेदी करण्याऐवजी घरच्या घरी तयार करू शकता.

-सर्वात प्रथम एलोवेरा घेऊन त्यावरील साल काढून टाका
-आता त्यामधील जेल हे एका भांड्यात काढा
-असे केल्यानंतर जेल मिक्सरमध्ये वाटून घ्या
-जेल अगदी व्यवस्थितीत पातळ होई पर्यंत वाटा
-अशाप्रकारे तयार होईल तुमचे एलोवेरा जेल

- Advertisement -

एलोवेरा जेल आणि व्हिटॅमिन ई ऑइलपासून असा तयार करा मेकअप रिमूवर

चेहऱ्यावर रात्रभर मेकअप तसाच ठेवला तर पोर्स क्लॉग होतात. पोर्सला अन क्लॉग करण्यासाठी तुम्ही मेकअप रिमूव करणे गरजेचे आहे. अशातच तुम्ही बाजारात मिळणाऱ्या क्लींजरचा वापर केला पाहिजे असे नाही. एलोवेरा जेलच्या माध्यमातून ही तुम्ही क्लींजर तयार करू शकतात. मेकअप क्लींजर तयार करु शकता.

-स्प्रे च्या बॉटलमध्ये एक चमचा एलोवेरा ज्यूस टाका
-त्यात आता एक चमचा बदामाचे दूध आणि एक चमचा व्हिटॅमिन ई ऑइल टाका
-आता हे व्यवस्थितीत मिक्स करुन घ्या
-अशा प्रकारे तयार होईल एलोवेरा जेल मेकअप क्लींजर

कसे वापराल क्लींजर


सर्वात प्रथम चेहऱ्यावर क्लींजर स्प्रे करा आणि कॉटन बॉलच्या मदतीने मेकअप हटवा. गरज भासल्यास पुन्हा मेकअप क्लींजर लावा.


हेही वाचा- रात्री चेहऱ्यावर एलोवेरा जेल लावण्याचे ‘हे’ आहेत फायदे

- Advertisment -

Manini