Friday, May 17, 2024
घरमानिनीHealthमधाचा अधिक वापर करणे आरोग्यासाठी घातक

मधाचा अधिक वापर करणे आरोग्यासाठी घातक

Subscribe

अँन्टीऑक्सिडेंटने समृद्ध असलेले मध आपल्या शरिराला संक्रमणापासून दूर ठेवण्यास फायदेशीर असते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत रहावी म्हणून मधाचे सेवन केले जाते. त्यामुळेच बहुतांशजण साखरेऐवजी मधाचा वापर करतात. परंतु जर तुम्ही ते गरजेपेक्षा अधिक प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते.(over use of honey side effect on health)

वजन वाढू शकते 
जर तुम्ही अत्याधिक प्रमाणात मधाचे सेवन करत असाल तर यामुळे तुमचे वजन वाढू शकते. यामध्ये असलेली साखर आणि कार्ब्स हे शरिरात कॅलरीज वाढवतात. जे वजन वाढीचे कारण ठरू शकते. सर्वसामान्यपणे वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यात लिंबूचा रस आणि मध एकत्रित करुन प्यायले जाते.

- Advertisement -

पोट आवळल्यासारखे होणे
मध हे गरम असते. तुम्ही पदार्थाला गोडवा येण्यासाठी त्याचा वापर करू शकता. परंतु अत्याधिक प्रमाणात त्याचा वापर करू नये. यामुळे तुमच्या गट हेल्थला नुकसान पोहचू शकते. पचनक्रिया मंदावली जाऊ शकते आणि पोट दुखण्यास सुरुवात होते. या व्यतिरिक्त तुमच्या शरिरात कब्ज, ब्लोटिंग आणि डायरियाची समस्या सुद्धा उद्भवू शकते.

ब्लड शुगर वाढणे
जर तुम्ही दररोज मधाचे सेवन करत असाल तर यामुळे तुम्हाला गोड खाण्याची सवय लागू शकते. असे केल्याने तुमच्या रक्तातील साखर वाढू शकते. त्यामुळे स्वत:ला फीट ठेवण्यासाठी अधिक प्रमाणात मधाचे सेवन करणे टाळा.

- Advertisement -

ओरल हेल्थला नुकसान पोहचते
जर तुम्ही तुमच्या मीलमध्ये मधाचा वापर करत असाल तर त्याचा परिणाम दातांवर सुद्धा होतो. दात दुखणे, हिरड्यांना सूज येणे आणि कॅविटीची समस्या वाढू शकते. मध गोड असल्याने दात दुखण्याची समस्या होऊ शकते. आपल्या ओरल हेल्थला मेंन्टेन ठेवण्यासाठी तुम्ही मधाचा मर्यादेत वापर करा.

एलर्जीची समस्या
बहुतांश लोक अशी सुद्धा असतात की, ज्यांना काही फूड्समुळे एलर्जीची समस्या उद्भवते. अशातच तुम्ही दररोज मधाचे सेवन करत असाल तर यामुळे उलटी, सूज येणे किंवा रॅशेजची समस्या उद्भवू शकते. जर तुम्ही दीर्घकाळ अशा प्रकारच्या एलर्जीपासून त्रस्त असाल तर तुम्हाला आरोग्यासंबंधित काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे डॉक्टरांना भेटा.


हेही वाचा- मधुमेह ते गॅस्ट्रिकच्या समस्येसाठी ‘या’ कुकिंग ऑइलचा करा वापर

- Advertisment -

Manini