Thursday, May 16, 2024
घरमानिनीHealthस्वत:साठी अशी निवडा गायनेकोलॉजिस्ट

स्वत:साठी अशी निवडा गायनेकोलॉजिस्ट

Subscribe

जेव्हा तुम्ही आई होणार असाल किंवा कंसीव करण्याचा प्रयत्न करत असाल तर याच दरम्यान तुम्हाला सर्वाधिक गरज असते ती म्हणजे गायनेकोलॉजिस्ट. जर तुम्ही योग्य आणि अनुभवी गायनेकॉलॉजिस्टची निवड केली तर तुमचे काम अगदी सोपे होऊ शकते. मात्र काही महिलांना या बद्दल माहिती नसते की, गायनेकोलॉजिस्ट निवडताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पहिजे. जर तुम्ही तुमच्यासाठी गायनेकॉलिजिस्ट पाहत असाल तर हे सुद्धा जाणून घ्या की, तेव्हा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

गायनेकोलॉजिस्टची रेपुटेशन
याबद्दल विचार करणे काहीही चुकीचे नाही. गायनेकॉलॉजिस्ट सोबत तुम्ही शरिर, आरोग्य आणि लैंगिक संबंधाबद्दल बोलू शकता. मात्र तत्पूर्वी त्यांचे रेपुटेशन कशी आहे हे सुद्धा पहा. यासाठी सर्वात प्रथम पहा की, त्या कोणत्या कोणत्या रुग्णालयाशी जोडल्या गेल्या आहेत. यावरुन कळेल की, त्यांना किती वर्षांचा आणि कोणत्या गोष्टींचा अधिक अनुभव आहे.

- Advertisement -

गायनेकॉलॉजिस्टल स्वभावाने कशी आहे
जेव्हा तुम्ही एखादी गायनेकॉलॉजिस्टची निवड करत असाल तर यामध्ये तुम्ही पहा की, गायनेकोलॉजिस्ट आपत्कालीन स्थितीवेळी फोनवरुन तुमच्याशी कशी डील करेल, नॉन एमरजेंसीमध्ये त्या किती लवकर रिप्लाय करतात आणि रुटीन अपॉइंटमेंटसाठी तुम्हाला किती वेळ वाट पहावी लागते.

डॉक्टरची फी किती आहे
डॉक्टरची फी किती आहे हे सुद्धा फार महत्त्वाचे असते. उपचारावेळी औषध आणि विविध चाचण्यांसाठीच अधिक खर्च होते. त्यामुळे डॉक्टरांच्या फी कडे सुद्धा लक्ष देणे फार गरजेचे आहे. डॉक्टरांच्या फी मध्ये अधिक फरक नसतो. मात्र तुम्ही पाहू शकता की, तुम्हाला नक्की कशाची गरज आहे.

- Advertisement -

पुढील प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत
आपल्यासाठी गायनेकोलॉजिस्ट निवडताना तुम्ही तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरे देईल का, त्या फ्रेंन्डली आणि रिस्पॉन्सिव्ह आहे का हे सुद्धा पहा. जर पहिल्यांदा भेटल्यानंतर तुम्ही या गोष्टींबद्दल कंम्फर्टेबल नसाल तर तुम्ही दुसऱ्या गायनेकोलॉजिस्टची निवड करु शकता.

एखाद्या मैत्रिणीचा सल्ला घ्या
जर तुम्हाला गायनेकोलॉजिस्ट मिळत नसेल तर तुम्ही तुमच्या मैत्रिणीला विचारू शकता. आपल्या फ्रेंन्ड सर्कलमध्ये एखादी उत्तम गायनेकोलॉजिस्टला ओळखत असेल तर ते तुम्हाला रेफ्रेंस देतील.


हेही वाचा- प्रेग्नेंसीदरम्यान महिलेला होते ब्रेनसंदर्भात समस्या

- Advertisment -

Manini