Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthप्रेग्नेंसीदरम्यान महिलेला होते ब्रेनसंदर्भात समस्या

प्रेग्नेंसीदरम्यान महिलेला होते ब्रेनसंदर्भात समस्या

Subscribe

प्रेग्नेंसीदरम्यान महिलांना काही समस्यांचा सामना करावा लागतो. त्यापैकीच एक समस्या म्हणजे प्रेग्नेंसी ब्रेन. तुम्ही आता विचार कराल ही कोणती समस्या आहे, ज्याबद्दल आजपर्यंत ऐकले नसेल. खरंतर प्रेग्नेंसीदरम्यान जर एखाद्या महिलेची स्मरणशक्ती कमी झाली असेल किंवा ती काही गोष्टी विसरत असेल तर त्याला ‘प्रेग्नेंसी ब्रेन’ असे म्हटले जाते. याला काही नावांनी ओळखले जाते. जसे की, बेबी ब्रेन, मम्मी ब्रेन आणि मॉमनेशिया.

गायनेकोलॉजिस्ट असे म्हणतात की, प्रेग्नेंसी ब्रेनची समस्या केवळ प्रेग्नेंट महिलांमध्येच दिसते. अमेरिका आणि युरोपात ही समस्या गांभीर्याने घेतली जाते. मात्र भारतात याकडे दुर्लक्ष केले जाते. तर प्रेग्नेंसी दरम्यान महिलेतील काही हार्मोन्स जसे की, एस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन आणि ग्रोथ हार्मोन वाढले जातात. दुसरे म्हणजे फिजिकल बदल सुद्धा महिलेत होतात. सुरुवातीला महिलांना उलट्या होतात. त्यानंतर वजन वाढल्यानंतर श्वास घेणे, चालण्याफिरण्यास समस्या होते.

- Advertisement -

या व्यतिरिक्त महिला साइकोलॉजिकल बदलावातून सुद्धा जाते. महिलांना येणाऱ्या बाळाबद्दल आनंद ही असतो आणि भीती सुद्धा वाटत राहते. काय खावे, काय खाऊ नये, मुलाची डिलिवपी नॉर्मल होईल की सिजेरियन. अशा काही चिंता महिलेला सतावत असतात. अशातच त्यांची झोप डिस्टर्ब होते आणि तणाव वाढतो. याच दरम्यान महिला लहान-लहान गोष्टी विसरते आणि तिला आठवत नाही की, औषधं घेतली आहेत की नाही. हिच अवस्था प्रेग्नेंसी ब्रेन म्हणून ओळखली जाते.

- Advertisement -

नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिनच्या एका अभ्यासानुसार, 80 टक्क्यांपेक्षा अधिक प्रेग्नेंट महिलांमध्ये विसरण्याची समस्या किंवा स्मरणशक्ती कमी झाल्याचे समोर आले आहे. हे प्रेग्नेंट महिलांनी सुद्धा मान्य केले आहे. प्रेग्नेंसी ब्रेनची सुरुवात गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीत सुरु होते. जेव्हा शरिरात काही हार्मोन्स फार वाढले जातात. मात्र जर प्रेग्नेंसी ब्रेनकडे दुर्लक्ष केल्यास तर काही नुकसान होऊ शकते. ऐवढेच नव्हे तर गंभीर मेमोरी प्रॉब्लेम झाल्यास कामावर परतण्यास ही समस्या होते.


हेही वाचा- वर्किंग मॉम आहात, बाळाला ब्रेस्ट फीडींगची चिंता सतावतेय?

- Advertisment -

Manini