घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरमणिपूर जळत असताना पंतप्रधानांनी तिकडे ढुंकूनही पाहले नाही; शरद पवारांचा मोदींवर घणाघात

मणिपूर जळत असताना पंतप्रधानांनी तिकडे ढुंकूनही पाहले नाही; शरद पवारांचा मोदींवर घणाघात

Subscribe

राष्ट्रवादीचा आज बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्वाभीमान सभेमध्ये शरद पवार बोलत होते. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी मला आजचा उत्साह आणि गर्दी पाहून जुन्या काळासारखे आज निष्ठेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे दिसून आले.

बीड : केंद्र आणि राज्यातील सत्ता चमात्कारीक लोकांच्या हाती आहे. यांना सर्वसामान्यांची होणारी घुसमट कळत नसून नुसत्या घोषणांचा पाऊस पाडल्या जात आहे. तर देशाच्या ईशान्यकडेल राज्य पेटलेले असतानाही ते शांत कसे करता येतील यासाठी केंद्र सरकारकडून कुठलेच पाऊले उचलले जात नाहीत.तर मणिपूरमध्ये गावच्या गावे जाळल्या जात आहेत आणि स्त्रीयांची धिंड काढली जात असतानाही मात्र, देशाच्या पंतप्रधानाना त्याचे काहीएक सोयरसुतक नसून, त्यांचे मणिपूरला जाणे गरजेचे असतानाही त्यांनी तिकडे ढुंकूनही पाहले नाही असा थेट घणाघात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर केला.(When Manipur was burning the Prime Minister did not even look at it Sharad Pawar attack on Modi)

राष्ट्रवादीचा आज बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्वाभीमान सभेमध्ये शरद पवार बोलत होते. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी मला आजचा उत्साह आणि गर्दी पाहून जुन्या काळासारखे आज निष्ठेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे दिसून आले. तर आजची देशाची स्थिती वाईट आहे. चमत्कारीक लोकांच्या हाती सत्ता गेल्याने ते जात, धर्म आणि भाषा या मुद्द्यावरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या जात असल्याचे म्हणत शरद पवार यांनी केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तर समाजात अंतर कसं वाढवता येईल अशी निती आजच्या राज्यकर्त्यांची असल्याचे ते म्हणाले. आज देशात अनेक प्रश्न आहेत. महागाई, पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या. उत्तम शेती करायची असेल तर पाणी पाऊस हवाच पण खते, बी-बियाण्यांची गरज आहे. खताच्या किंमती किंमती वाढल्या आहेत त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. मात्र या सरकारला त्याची चिंता नाही.

- Advertisement -

हेही वाचा : JITENDRA AWHAD : …आता नातू तुमच्यासाठी लढायला तयार झालेत; आव्हाडांनी बीडमधील सभेत व्यक्त केला विश्वास

कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक

देशातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, इशान्यकडेल राज्यात आज हिंसाचार वाढत आहे. यांच्या शेजारी चीन आणि पाकिस्तान आहे. त्यांची नजर आपल्या देशावर आहे. त्यामुळे सतर्क राहावे लागते. जर आपण गाफिल राहलो तर कधी काय होईल सांगता येत नाही. आज मणिपूर पेटला आहे. समाजा-समाजामध्ये भांडण झाली, एक वर्गविरुद्ध दुसरा वर्ग अशी स्थिती आहे. गावे जाळली जात आहेत, स्त्रियांची धिंड काढली जाते. असे असतानाही भाजप सरकार कुठल्याही प्रकारचे पाऊले टाकत नाही. देशाचे पंतप्रधानांनी इतक्या बघिणींची अशी अवस्था झालेली असतानाही मणिपूर जाणे आवश्यक होते मात्र, पंतप्रधानाने ढुंकणसुद्धा पाहले नाही, तर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अविश्वास प्रस्तावावर फक्त 3 मिनिटं बोलले, एकुणच त्यांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत असल्याचे म्हणत शरद पवार यांनी मोदींवर थेट निशाणा साधला.

- Advertisement -

हेही वाचा : मंत्रिपदासंदर्भात बच्चू कडू थेटच बोलले; म्हणाले – छातीवर तलवार…

लोकशाही मार्गाने निवडूण आलेली सरकारे पाडली जातात

केंद्रावर विश्वास ठेऊन चालणार नाही, लोकशाहीमध्ये जनतेने निवडूण दिलेली सरकारे पाडली जात आहे. गोवा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटकची सरकारी पाडली होती. केंद्रातील सत्ता वापरून ही उद्योग केली जात आहे. ही सगळी आव्हाने आपल्या समोर आहेत. या सरकारच्या काळात कुठे काहीही होते म्हणत सर्वसामान्य जनतेचे जीणं या सरकारने बेहाल केले असल्याचे म्हणत शरद पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली.

ठाण्यातील त्या घटनेचाही केला उल्लेख

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, दोन ते तीन दिवसांपूर्वी ठाण्यातील एका सरकारी रुग्णालयात 18 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये लहान बालके होती,महिला, वयोवृद्ध होती असे असतानाही राज्य सरकार बघ्यांची भूमिका घेते. तेव्हा राज्याची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे यातून दिसून येते.

या चुकीच्या लोकांना आवरायचे आहे

पुढे बोलताना शरद पवार यांनी राज्यातील सत्ताधारी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, आता वेळ आली आहे, या चुकीच्या लोकांना आवरायचे आहे. सत्तेचा गैरवापर केल्या जात आहे. अनेकांना जेलमध्ये डांबले जात आहे. परळीत हा प्रकार खूप वाढला आहे. तर एका कार्यकर्त्यांचा दाखला देत त्याने पक्ष सोडताना माझ्या वयाचा उल्लेख केला होता. पण नेहमी माझ्या वयाचा उल्लेख करता, माझं वय झालं म्हणता, पण तुम्ही माझं काय बघितले? अशी मिश्किल टिप्पणी शरद पवार यांनी यावेळी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -