Thursday, May 9, 2024
घरमानिनीHealthअपूरी झोप शरीरासाठी घातक

अपूरी झोप शरीरासाठी घातक

Subscribe

आपलं आरोग्य निरोगी राहण्यासाठी योग्य आणि सकस आहाराची गरज असते तशी पुरेश्या झोपेची सुद्धा गरज असते.बदललेली जीवनशैली, कामाच्या वेळा, ताणतणाव, मोबाईल अथवा गॅझेट्सचा अतिवापर या सगळ्यामुळे सध्या झोप कमी होण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामुळे आरोग्यावर अतिशय विपरित परिणाम होतात. झोप न येण्याची कारणं काहीही असली तरी त्याचा मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो.

अपुर्ण झोपेमुळे होतात दुष्परिणाम

Sleep Deprivation: Effects of lack of Sleep on Your Body

- Advertisement -
  • मेंदूवर होतो परिणाम

पुरेशी झोप मिळत नसल्यामुळे, कोणत्याही गोष्टीकडे लक्ष केंद्रीत करण्याची अर्थात मन एकाग्र करण्याची क्षमता कमी होते. याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर होतो. पण 8 तास झोप मिळाली तर तुम्ही पूर्ण दिवस आनंदी आणि तरतरीत राहू शकता.

  • सतत मूड बदलतो

कमी झोप मिळाल्यामुळे तुमचा मूड सतत बदलत राहतो. अपूर्ण झोप असल्यास काळजी, ताण, नैराश्य, सतत विचार करणे या सगळ्या समस्या उद्भवतात. त्यामुळे त्याचा परिणाम शरीरावर होतो.

- Advertisement -
  • अपुऱ्या झोपेमुळे रोग

सतत विचार, चिंता आणि वैताग यामुळे झोप अपुरी होते. त्यामुळे ह्रदयरोग, मधुमेह, लठ्ठपणा, निराशा असे रोग तुम्हाला जडतात. एकदा हे रोग जडले की, तो बरा होणं शक्य नसतं. त्यामुळे रोज आठ तास झोप मिळालीच पाहिजे याची काळजी घ्यावी.

  • स्मरणशक्तीवर होतो परिणाम

अपुऱ्या झोपेमुळे स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे विचार करण्याच्या शक्तीवर मर्यादा येतात. या सगळ्याचा परिणाम सकारात्मक विचारसरणीवर देखील होतो. स्मरणशक्ती कमी झाल्यामुळे एकाग्रतेवरदेखील परिणाम होतो.

  • मनोविकार उद्भवतात

अपुरी झोप ही गंभीर समस्या आहे. मात्र, लोक त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत. त्यामुळे अतिविचार करून मनोविकार उद्भवतात. याकडे वेळेवर लक्ष देऊन डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

 


हेही वाचा :

मल्टीव्हिटामिनच्या गोळ्या खाणे घातक

- Advertisment -

Manini