Tuesday, December 10, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीHealthअपूर्ण झोपेचा आरोग्यावर होतो गंभीर परिणाम

अपूर्ण झोपेचा आरोग्यावर होतो गंभीर परिणाम

Subscribe

झोपेच्या कमतरतेमुळे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. म्हणून डॉक्टर कायम सर्व वयोगटातील व्यक्तींना पुरेशी झोप घेण्याचा सल्ला देतात. आपलं आरोग्य निरोगी राहण्यासाठी योग्य आणि सकस आहाराची गरज असते. तशी पुरेशा झोपेची सुद्धा गरज असते. बदलती लाइफस्टाइल ,इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स या सगळ्यामुळे अनेकांची झोप पूर्ण होत नाही. परिणामी, अपूर्ण झोपेमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. झोप न येण्याची कारणे काहीही असली तरी त्याचा सर्वात मोठा परिणाम मेंदूवर होत आहे.

मूडमध्ये बदलाव – अपूर्ण झोपेमुळे मूड बदलण्याची समस्या प्रकर्षाने जाणवते. अपूर्ण झोप असल्यास काळजी, चिंता, नैराश्य यासारख्या समस्या उदभवतात.

- Advertisement -

मेंदूवर होतो परिणाम – पुरेशी झोप न झाल्याने कोणत्याही गोष्टीकडे लक्ष केंद्रित करण्याची अर्थात मन एकाग्र करण्याची क्षमता कमी होते. याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यवर होतो. यासाठीच 8 तास घेणे गरजेचे असते कारण 8तासांच्या झोपेमुळे तुम्ही दिवसभर आनंदी आणि तरतरीत राहता.

स्मरणशक्तीवर होतो परिणाम – अपुऱ्या झोपेमुळे स्मशरणशक्ती कमी होण्याची शक्यता असते तसेच विचार करण्याच्या शक्तीवर मर्यादा येतात. या सगळ्याचा परिणाम सकारात्मक विचारसरणीवर होतो. स्मरणशक्ती कमी झाल्याने एकग्रतेवरही परिणाम होतो.

- Advertisement -

रोग होण्याचा धोका संभवतो – सतत विचार,चिंता आणि स्ट्रेस यामुळे झोप अपुरी होते त्यामुळे हार्ट प्रॉब्लेम, डायबिटीस, ओबेसिटी असे रोग होण्याच्या धोका संभवतो. हे आजार एकदा झाले का ते लवकर बरे होणे शक्य नसतात. त्यामुळे तुमची दररोज 8 तास झोपे होते का नाही याकडे लक्ष द्यायला हवे.

मनोविकार उदभवतात – अपुरी झोप ही एक गंभीर समस्या आहे. मात्र, अनेकजण त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे टाळतात. त्यामुळे अतिविचार करून मनोविकार उदभवतात. यासाठी वेळेवर लक्ष देऊन डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

चांगल्या झोपेसाठी सकस आहार ,नियमित व्यायाम,अंथरुणावर मोबाईल न वापरणे ,संख्याकाळी कॅफीनचे सेवन टाळणे यासारख्या गोष्टी पाळायला हव्यात.

 

 

 

 


हेही वाचा : व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी अशी घ्या खबरदारी

 

- Advertisment -

Manini