Monday, December 11, 2023
घरमानिनीHealthदररोज 7 तासाहून कमी झोप म्हणजे शारिरीक आणि मानसिक आजाराला आमंत्रण

दररोज 7 तासाहून कमी झोप म्हणजे शारिरीक आणि मानसिक आजाराला आमंत्रण

Subscribe

सध्याच्या बिझी लाईफस्टाईलमुळे अनेकांना व्यायामासाठी, जेवणासाठी जसा वेळ मिळत नाही तसाच पुरेशा झोपेसाठीही वेळ मिळेनासा झाला आहे. परिणामी अपुऱ्या झोपेमुळे निर्माण होणाऱ्या शारिरीक व्याधींबरोबरच मानसिक व्याधी असा दुहेरी सामना आजच्या पिढीला करावा लागत आहे. तज्ज्ञांच्या मते प्रत्येक व्यक्तीला दररोज कमीत कमी ७ तासांची झोप घेणे अनिर्वाय आहे. कारण पुरेशा झोपेमुळे मेंदूला आराम मिळतो. तसेच पचनक्रियाही सुधारते, रोगप्रतिकारकशक्तीही वाढते. यामुळे 7 तासाची झोप घेणे गरजेचे आहे.

कारण झोपेच्या त्या 7 तासात शरीर स्थिर असते. त्यामुळे शरीरातील पेशी आणि स्नायूंनाही आराम मिळतो. मेंदूला रक्तपुरवठाही सुरळीत होतो. यामुळे झोप पूर्ण झाल्यानंतर आपल्याला  फ्रेश वाटते. पण जर तुम्ही 7 तासापेक्षाही कमी वेळ झोप घेत असाल तर या प्रक्रियेत खंड पडतो. त्याचा परिणाम शरीराबरोबरच मानसिक अवस्थेवरही होतो.

- Advertisement -

A lack of sleep can induce anxiety

  • थकवा

7 तासापेक्षा कमी झोप घेणाऱ्यांना सकाळी उठल्यानंतर आळस आणि थकवा जाणवतो. यामुळे अशा व्यक्तींचे कामात लक्ष लागत नाही.  त्यांच्या निर्णयक्षमतेवरही त्याचा परिणाम होतो.

- Advertisement -
  • वजन वाढणे

झोप आणि वजन यांचा थेट संबंध असून कमी झोपेमुळे  शरीरातील ग्रेलिन आणि लेप्टीन या दोन हार्मेोन्समधील समतोल बिघडतो. यामुळे अचानक खूप भूक लागते. पोट भरलेले असतानाही व्यक्ती खातं सुटते.

  • मानसिक स्थिती

अपुऱ्या झोपेमुळे उदास वाटते, कुठल्याच कामात रुची निर्माण होत नाही. अनेकवेळा स्मरणशक्तीवर त्याचा परिणाम होतो. विसराळूपणाची समस्या वाढते.  कुठल्याच कामात मन एकाग्र होत नाही. चिडचिड होते. अनेकवेळा नैराश्यही येते.

  • हार्ट अटॅक

ज्यावेळी आपण झोपतो तेव्हा आपले शरीरही आराम करत असते. त्यामुळे एकप्रकारे शरीरात अंतर्गत दुरुस्तीची प्रक्रिया सुरू असते. पण अपुऱ्या झोपेमुळे ही प्रक्रिया बिघडते त्यामुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास सुरू होतो. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोकाही वाढतो.


हेही वाचा :

हृदय चांगलं ठेवण्यासाठी योगा आहे फायदेशीर

- Advertisment -

Manini