Saturday, May 18, 2024
घरमानिनीRelationshipमुलांकडून योगा करुन घेताना 'या' चुका करू नका

मुलांकडून योगा करुन घेताना ‘या’ चुका करू नका

Subscribe

योगा केल्याने तन आणि मन दोन्ही हेल्दी राहण्यास मदत होणार आहे. लहानांपासून ते वयस्कर व्यक्तींना दररोज योगा करण्याचा सल्ला दिला जातो. सर्वसामान्यपणे मुलं ही आपल्या पालकांना पाहून योगा करण्यास शिकू लागतात. खरंतर असे होणे उत्तमच आहे. परंतु काही वेळेस मुलाच्या चुकीच्या पद्धतीने योगा केल्याने त्यांना फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.

यामध्ये चुक ही मुलाची नाही तर पालकांची असते. मुलं आपल्या पालकांना पाहूनच शिकत असतात. अशातच त्यांच्या चुकीचा परिणाम मुलावर पडतो. अशातच मुलांकडून योगा करून घेताना पुढील चुका करणे टाळले पाहिजे.

- Advertisement -

अधिक सीरियस होणे
हे खरं आहे की, आरोग्यासाठी योगा फायदेशीर ठरतो. मात्र मुलांकडून योगा करून घेताना त्यांच्यासोबत अधिक सीरियस होणे चुकीचे आहे. कारण लहान मुलं ही चंचल असतात. त्यांच्या कलेने तुम्ही त्यांच्याकडून योगा करून घेऊ शकता.

- Advertisement -

वार्मअप आणि कूल डाउन स्किप करणे
काही वेळेस पालक या गोष्टीकडे लक्ष देत नाही की, मुलांकडून वार्मअप किंवा कूल डाउन करणे अत्यंत गरजेचे असते. काही वेळेस थेट योगाचे सेशन सुरु केले जाते. मात्र असे करू नये. यामुळे मुलांचे मसल्स खेचल्यासारखे किंवा त्यांना दुखापत होऊ शकते.

पोश्चरची प्रॅक्टिस
मोठ्यांप्रमाणेच मुलांसाठी सुद्धा योगाचे सुरुवातीचे सेशन सोपे नसते. प्रयत्न करा की, तुम्ही योगा सेशन दरम्यान त्यांच्याकडून असा योगा करून घ्या जो सोप्पा आणि लहान मुलांना सहज करता येईल. सुरुवातीला मुश्किल पोश्चरची प्रॅक्टिस करुन घेऊ नका.

वयानुसार योगा करुन घ्या
प्रत्येक मुलाचे वय वेगवेगळे असते. त्यामुळे योगाभ्यास करताना वयाची काळजी घ्या. काही वेळेस या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते की, त्यांच्याकडून नक्की कोणता योगा करून घ्यावा. त्यामुळे पालकांनी मुलांकडून योगा करून घेताना आधी सोप्पा आणि त्यांना जमेल असा करून घ्यावा.


हेही वाचा- मुलांचा मानसिक विकास आणि मातृभाषा

- Advertisment -

Manini