Sunday, October 1, 2023
घर मानिनी Relationship मुलांचा मानसिक विकास आणि मातृभाषा

मुलांचा मानसिक विकास आणि मातृभाषा

Subscribe

मातृभाषा म्हणजेच मायबोली. असं म्हणतात आईच्या कुशीत असताना बाळाच्या कानावर तिचे जे पहीले शब्द पडतात ती असते मातृभाषा. कारण बाळाशी पहील्यांदाच संवाद साधताना आई जे काही शब्द उच्चारते ते तिच्या अंतर्मनातून आलेले असतात ज्यांचा थेट संबंध भावनेशी असतो. यामुळे बाळाच्या मानसिक विकासात मातृभाषा महत्वाची भूमिका बजावते.

- Advertisement -

सध्याच्या आधुनिक युगात नोकरी, व्यवसायासाठी इंग्रजीबरोबरच तत्सम भाषा येणेही महत्वाचे आहे. पण असे असले तरी मुलांच्या मानसिक विकासात मातृभाषेचे विशेष महत्व आहे हे आता संपूर्ण जगानेही मान्य केले आहे. याच उत्तम उदाहरण म्हणजे आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा विचार करत असतो, काहीतरी आठवत असतो किंवा अगदी झोपेत स्वप्न बघत असतो, बरगळत असतो तेव्हा ते सगळं आपण मातृभाषेतूनच अनुभवत असतो.

- Advertisement -

कारण मुलचं काय आपणही जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्या कानावर घरात , आजूबाजूला ज्या भाषेतील वाक्य, शब्द आदळत असतात. त्यांचा आपल्या अचेतन मस्तिष्कावर प्रभाव पडतो. यामुळे ही मातृभाषा आपल्या मेंदूवरच नाही तर मनावरही प्रतिबिंबित होते. यामुळे मातृभाषेत बोलताना मुलं अधिक व्यक्त होतात. यामुळे मुलं शिक्षण जरी दुसऱ्या भाषेत घेत असली तरी त्यांच्याशी मातृभाषेत बोलावे. त्यामुळे त्यांना नेमके काय सांगायचे आहे हे पालकांना सहज समजू शकते.


हेही वाचा- Hyper Active मुलाला असं करा हँन्डल

- Advertisment -

Manini