घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरशरद पवार ऑन द स्पॉट: जखमी आंदोलनकर्त्यांकडून जाणून घेतली लाठीचार्ज प्रकरणाची माहिती

शरद पवार ऑन द स्पॉट: जखमी आंदोलनकर्त्यांकडून जाणून घेतली लाठीचार्ज प्रकरणाची माहिती

Subscribe

इंडिया आघाडीची बैठक सुरू असतानाच दुसरीकडे जालन्यात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता मराठा आंदोलकांकडे वळले आहे.

जालना : आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे अनेक मराठा आंदोलक जखमी झाले होते. ही घटना संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर राजकीय नेत्यांनी अंतरावली सराटी गावाला भेट दे उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. असे असतानाच मात्र शरद पवार यांनी थेट रुग्णालय गाठत जखमी आंदोलकांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी मराठा आंदोलकाना धीर देण्याचा प्रयत्न केला.(Sharad Pawar on the spot: Learned about the lathicharge case from the injured protesters)

इंडिया आघाडीची बैठक सुरू असतानाच दुसरीकडे जालन्यात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता मराठा आंदोलकांकडे वळले आहे. एकुणच हा लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न तर करण्यात आला नाही ना अशी शंका शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना उपस्थित केली होती. तर घडलेल्या घटनेच्या दिवशीच शदर पवारांनी माध्यमांवर प्रतिक्रिया देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. दरम्यान आज त्यांनी थेट घटनास्थळी म्हणजे रुग्णालयात जाऊन जखमी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून माहिती जाणून घेतली.

- Advertisement -

हेही वाचा : Maratha Reservation Protest: सहनशीलतेचा अंत बघू नका; उदयनराजेंचा सरकारला इशारा

आस्थेने केली जखमींची विचारपूस

जालना जिल्ह्यातील अंबड येथे शरद पवारांनी सुरुवातीलाच रुग्णालयात जखमी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. जखमींची आस्थेवाईकपणे चौकशी केल्यानंतर शरद पवारांनी आंदोलनस्थळ गाठत आंदोलकांशी संवाद साधला. आंदोलनस्थळी अगोदरच खासदार उदयनराजे दाखल झालेले होते. यावेळी एकाचवेळी शरद पवार आणि उदयनराजे भोसले एकत्र दिसून आले.

- Advertisement -

हेही वाचा : मुंबईवरून आदेश आल्यानंतर आंदोलकांवर लाठीचार्ज; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

उपोषणकर्त्यांशी साधला पवारांनी संवाद

आंतरवाली सराटी येथे आंदोलकांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, मराठा समाजाची आरक्षणाची मागणी जुनीच आहे. सरकार दुर्लक्ष करीत असल्यामुळे मराठा आंदोलकांना वारंवार उपोषण करावं लागत आहे. सरकारने शब्द न पाळल्याने आंदोलन सुरु केले होते. मात्र बळाचा वापर करुन आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी हवेत गोळीबार करुन आंदोलकांना हुकसावून लावले. मोठ्या संख्येने पोलिस आंदोलनस्थळी आणले गेले.. मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही असेही यावेळी शरद पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -