Thursday, May 16, 2024
घरमानिनीHome Cleaning Tips - अर्ध्या तासात करा घराची साफ सफाई

Home Cleaning Tips – अर्ध्या तासात करा घराची साफ सफाई

Subscribe

प्रत्येक गृहिणीला आपलं घर स्वच्छ, सुंदर असावं असं वाटत असतं. त्यासाठी तिचे हात सतत राबत असतात. अशातच घरातला सगळा पसारा एकाच वेळी कसा व्यवस्थित ठेवता येईल याकडे आपल सगळं लक्ष असत.

घर म्हंटल कि स्वच्छता हि आलीच आणि अशातच घरातला पसारा आपल्याला आवरण्यासाठी खूप वेळहा जातोच. त्यामुळे लगेच सोप्या पद्धतीत पसारा कसा आवरून होईल या कडे आपले लक्ष लागलेले असते. घरातला सगळा पसारा एकाच वेळी कसा व्यवस्थित ठेवता येईल याकडे आपल सगळं लक्ष असत.

- Advertisement -

घराची स्वच्छता कराताना ‘या’ टिप्स करा फॉलो-

  • लिविंग रूम पासून करा सुरुवात-
    आपण ज्या खोलीत जास्त वेळ असतो तिकडची साफ सफाई सर्वात आधी करावी. यामध्ये महत्वाचे म्हणजे गादीच कव्हर धुणं केवळ अशक्य आहे. ती मळू नये म्हणून आपण त्यावर कव्हर टाकतो. कव्हर कितीही धुतलं, तरी मूळ गादी काही स्वच्छ होत नाही. अशातच बेकिंग सोडा आणि व्हॅक्युम क्लिनर येईल याची मदत होईल. गादीवर बेकिंग सोडा पसरवा आणि काही वेळ तसाच ठेवा. त्यानंतर व्हॅक्युम क्लिनरनं गादी साफ करा. यामुळे गादीचा येणारा कुबट वास आणि त्याच्यावरील डाग नाहीसे होतील. याचपद्धतीनं जुने सोफेही स्वच्छ केले जाऊ शकतील.

How to Hire the Best House Cleaner

- Advertisement -
  • नळ साफ करताना या गोष्टी करा-
    कितीही महागड्या किमतीचे नळ किंवा बाथरूम मिक्सर वापरले, तरी त्याच्यावरील पाण्याचे डाग त्याचा लूक खराब करतात. अशावेळी वॅक्स पेपरच्या साहाय्यानं नळ स्वच्छ करा. यामुळे पाण्याचे डाग लवकर जमाही होणार नाहीत.

How To Clean A Kitchen Sink & Remove Stains - Bond Cleaning Newcastle

  • ​कार्पेट साफ करताना असे करा-
    दरवेळी कार्पेट धुणं शक्य नसतं. व्हॅक्युम क्लिनरनं त्याच्यावरची धूळ स्वच्छ केली जात असली, तरी डाग अनेकदा तसेच राहतात. अशावेळी व्हिनेगर कामी येईल. एका बाजूला व्हिनेगर आणि दुसऱ्या बाजूला पाणी असं मिश्रण तयार करून त्याचा स्प्रे तयार करा आणि स्प्रे बाटलीमध्ये हे मिश्रण भरा. आणि याच्या मदतीने कार्पेट साफ करून घ्या.

Best Carpet Cleaning Service | Carpet Cleaning Agency in Delhi

  • सिंक साफ करताना असे करा-
    सिंकमध्ये सोडा पसरवल्यानंतर जुन्या टूथब्रशने ते घासून घ्या. यामुळे सिंकला चकाकी येईल. सिंकमधून घाणेरडा वास येत असल्यास लिंबूचे तुकडे घालून सिंकच्या वरच्या बाजूला नीट स्वच्छ करून घ्या.

How to Clean Your Sink with Baking Soda: 12 Steps (with Pictures)

  • ​काचेच्या खिडक्या अशा पद्धतीने साफ करा-
    लिक्विड सोपच्या साहाय्यानं खिडक्या साफ केल्यानंतर न्यूज पेपरच्या साह्याने काच पुसा. यामुळे काचेची पारदर्शकता वाढेल आणि ती खूप चमकेल. तसेच सुंदर आणि स्वच्छ दिसेल.

Why Does Newspaper Clean Windows? (2022 Update) - NICK'S Window Cleaning


हेही वाचा :

Iron Cleaning Hacks : इस्त्रीवर गंज चढलाय? मग करा ‘हे’ उपाय

- Advertisment -

Manini