घरदेश-विदेशप्रत्येक हिंदूंने 4-5 मुलं जन्माला घालावीत; कथावाचक देवकीनंदन यांचा सनातनींना अजब सल्ला

प्रत्येक हिंदूंने 4-5 मुलं जन्माला घालावीत; कथावाचक देवकीनंदन यांचा सनातनींना अजब सल्ला

Subscribe

मुस्लिम लोकं 40-40 मुलं जन्माला घालत आहेत. तर हिंदूंनी 4-5 मूलं तरी जन्माला घालावीत. मला स्वत:ला चार मुलं आहेत, असं म्हणत देवकीनंदन यांनी सनातनींना जेवढी जमतील तेवढी मुलं जन्माला घाला, असा अजब सल्ला दिल्याने, खळबळ उडाली आहे.

देशातील लोकप्रिय भागवत कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांनी मोठे विधान केले आहे. मुस्लिम लोकं 40-40 मुलं जन्माला घालत आहेत. तर हिंदूंनी 4-5 मूलं तरी जन्माला घालावीत. मला स्वत:ला चार मुलं आहेत, असं म्हणत देवकीनंदन यांनी सनातनींना जेवढी जमतील तेवढी मुलं जन्माला घाला, असा अजब सल्ला दिल्याने, खळबळ उडाली आहे.

भोपाळच्या दशहरा मैदानात सध्या देवकीनंदन यांचे कथावाचन सुरु आहे. त्यासाठी, हजारो भक्तांनी मंडपात गर्दी केली आहे. गेल्या 5 दिवसांपासून येथे कथावाचन सुरु असून यात देवकीनंदन यांनी केलेल्या काही विधानांची जोरदार चर्चा होत आहे. त्यासोबतच, हे विधान वादग्रस्त असल्याने टीकाही होत आहे. नुकतेच त्यांनी मुलं जन्माला घालण्याबाबत केलेल्या विधानावरुन वाद निर्माण झाला आहे. (Every Hindu should give birth to 4-5 children Bhagawat Narrator Devkinandan’s strange advice to Sanatani )

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले देवकीनंदन?

अल्पसंख्याक हे 40-40 मुलं जन्माला घालू शकतात. मग आपण हिंदू 4-5 मुलं जन्माला घालू शकत नाहीत का ? असे विधान देवकीनंदन यांनी केले. माझी स्वत:ची 4 मुलं आहेत. त्यामुळे मी हिंदूंना 5-5 मुलं जन्माला घालण्याचे बोलत आहे, असेही देवकीनंदन म्हणाले. जोपर्यंत लोकसंख्या नियंत्रण कायदा होत नाही, तोपर्यंत बहुसंख्य राहाल असे कार्य करा. सनातनी हेच बहुसंख्य असायला हवेत, अन्यथा हा देश सेक्युलर राहणार नाही, असेही देवकीनंदन यावेळी म्हणाले.

देवकीनंदन म्हणतात की, आम्ही 60 कोटी झाल्यानंतर हा देश आमचा होईल, आत्ता ते 30 कोटी आहेत, तरीही तशी भाषा करतात. युट्यूबवर याबाबतचे व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतील. हे आत्ताच असं बोलत असतील, मग पुढे काय होईल, असा प्रतिप्रश्नच देवकीनंदर महाराज यांनी एका प्रसारमाध्यमाशी बोलताना विचारला.

- Advertisement -

( हेही वाचा: छत्रपती संभाजीनगर राड्याप्रकरणी जलील यांचं थेट पंतप्रधानांना पत्र; केले हे गंभीर आरोप )

रस्त्यांवरुनही मुघलांची नावं काढून टाका

इतिहासाच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकण्यात आला आहे. यावर देखील देवकीनंदन यांनी यावेळी भाष्य केलं. देवकीनंदन म्हणाले की, या देशात प्रभू राम-कृष्ण हे महान राहतील, असेही देवकीनंदन यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -