Thursday, December 7, 2023
घरमानिनीHealthलिंबूच्या सालीचे 'हे' आहेत फायदे

लिंबूच्या सालीचे ‘हे’ आहेत फायदे

Subscribe

लिंबूचे आपल्या आरोग्याला काय फायदे होतात हे माहितेयत. परंतु त्याची साल ही आरोग्यासाठी गुणकारी असते. बहुतांशवेळा आपण लिंबूची साल फेकून देतो. जी आपण सर्वात मोठी चूक करतो. खरंतर लिंबूची साल फेकून देण्याऐवजी त्याचा वापर केला पाहिजे. लिंबूच्या सालीत असे काही पोषक तत्वे असतात की, जे एकूणच आरोग्यासाठी फायदेशीर असतात. खासकरून ते केस आणि त्वचेसाठी उत्तम असते.

-ओरल हेल्थसाठी फायदेशीर
डेंटल कॅव्हिटी आणि हिरड्यांसंबंधित संक्रमणामुळे काही लोक त्रस्त असतात. अशातच लिंबूच्या सालीत अँन्टीबॅक्टेरियल गुण असतात जे तोंडात माइक्रोऑर्गेनाइज्मच्या ग्रोथला कमी करते. त्यामुळे दात आणि हिरड्यांसह एकूणच ओरल हेल्थ राखले जाते.

- Advertisement -

15 Surprising Benefits of Lemon Peel For Skin and Body Care - Conserve  Energy Future

-इम्युनिटी बूस्टर
लिंबूच्या सालीत फ्लेवोनॉइड आणि व्हिटॅमिन सी असल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर सर्दी-खोकला ते फ्लू सारख्या आजारांपासून दूर राहू शकता.

- Advertisement -

-त्वचेसाठी फायदेशीर
लिंबूच्या सालीत एस्कॉर्बिक अॅसिड आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्याचसोबत हे अँन्टीऑक्सिडेंटचा उत्तम स्रोत आहे. जो डिटॉक्सिफिकेशनसाठी मदत करते. हे सर्व पोषक तत्व ब्लॅमिशेजला कमी करतात आणि रिंकल्स येण्यापासून रोखतात. या व्यतिरिक्त यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेवर दिसून येणारे ऐज स्पॉट कमी करतात. तर कोलेजनची वाढ करतात. त्यामुळे त्वचा मऊ आणि ग्लो होते.

-वजन कमी करण्यास फायदेशीर
लिंबूचा रस वजन कमी करण्यास तुमची मदत करू शकतो. यासाठी पेक्टिन नावाचे एक कंपाउंड असते जे बेली फॅट कमी करण्यास फायदेशीर मानले जाते. याच्या नियमित सेवनाने मेटाबॉलिज्म बूस्ट होते. त्यामुळे तुम्ही अधिक प्रमाणात फॅट बर्न करू शकता.


हेही वाचा- कॅल्शिअमची कमतरता पूर्ण करतील ‘हे’ सुपरफूड्स

- Advertisment -

Manini