Monday, May 6, 2024
घरमानिनीसनस्क्रिन लावल्यानंतर ही त्वचा टॅन होतेय तर तुम्ही करताय 'या' चुका

सनस्क्रिन लावल्यानंतर ही त्वचा टॅन होतेय तर तुम्ही करताय ‘या’ चुका

Subscribe

उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. अशातच त्वचा टॅन होण्याची समस्या फार उद्भवते. त्यामुळेच प्रत्येक तरुणी अथवा महिला या उन्हाळ्यात घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रिन लावतात. जेणेकरुन टॅनच्या समस्येपासून दूर राहता येईल. अशातच तुम्ही सनस्क्रिन लावून ही तुमची त्वचा टॅन होतेय तर ते लावताना तुम्ही काहीतरी चुका करतायत. नक्की त्या कोणत्या चुका आहेत याच बद्दल अधिक जाणून घेऊयात.

सनस्क्रिन न लावणे हे तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरु शकते. सुर्याच्या किरणांमधून निघणारी हानिकारक किरणे स्किन सेल्सचा डॅमेज करतात. त्यामुळेच त्वचेसंबंधित काही समस्यांचा सामना करावा लागतो. जर तुम्ही सातत्याने हानिकारक किरणांच्या संपर्कात आलात तर स्किन कँन्सरचा धोका वाढू शकतो. त्यामुळे ते त्वचेवर लावणे पुरेसे नाही तर योग्य पद्धतीने सुद्धा लावणे गरजेचे आहे.

- Advertisement -

सनस्क्रिन लावताना ‘या’ चुका करणे टाळा
-फार कमी प्रमाणात सनस्क्रिन लावणे
सर्वसामान्यपणे लोक केवळ २०-३० टक्केच सनस्क्रिन लावतात. परंतु नेहमीच लक्षात ठेवा की, त्वचेचा जो हिस्सा कपड्याने झाकला जात नाही तेथे पुरेशा प्रमाणात सनस्क्रिन लावली पाहिजे. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी कमीत कमी १५ मिनिटे आधी तरी सनस्क्रिन लावा.

- Advertisement -

-ढगाळ वातावरणात सनस्क्रिन न लावणे
बहुतांश लोक ढगाळ वातावरण निर्माण झाल्यास लोक सनस्क्रिन लावणे टाळतात. अशातच जरी ढगाळ वातावरण झाले असले तरीही जवळजवळ ८० टक्के सुर्याच्या हानिकारक किरणांचा प्रभाव वातावरणात राहतो. तर सनस्क्रिन लावा.

-एसपीएफकडे दुर्लक्ष करु नका
सर्वसामान्यपणे बहुतांश सनस्क्रिन सुर्याच्या हानिकारक किरणांपासून आपला बचाव करते. परंतु सर्वच सनस्क्रिनचा फायदा होत नाही. केवळ काहीच सनस्क्रिन चाचणी पास करतात आणि त्यांना ब्रॉड स्पेक्ट्रमच्या नावाने ओळखले जाते. तर नेहमीच सनस्क्रिन खरेदी करण्यापूर्वी त्याचा SPF30 किंवा त्यापेक्षा अधिक असावा. एसपीएफचा आकडा जेवढा मोठ तेवढीच तुमच्या त्वचेची सुरक्षितता होईल.

-योग्य पद्धतीने न लावणे
सनस्क्रिन ही तुम्ही योग्य पद्धतीने लावली पाहिजे. काही वेळेस सनस्क्रिन स्प्रे चा वापर करण्याचा सल्ला देतात. परंतु स्प्रेच्या वापरामुळे कळत नाही की ते व्यवस्थितीत लागले आहे की नाही.

-संपूर्ण दिवसात केवळ एकदाच सनस्क्रिन लावणे
जर तुम्ही खुप वेळ घराबाहेर असाल तर कमीत कमी २ तासांनी एकदा तरी सनस्क्रिन लावावी. खासकरुन तेव्हा जेव्हा तुम्ही स्विमिंग करता.

 


हेही वाचा: Fashion Tips : उन्हाळ्यात चुकूनही वापरू नये ‘हे’ कापड

- Advertisment -

Manini