Wednesday, May 15, 2024
घरमानिनीHealthMonsoon Diet Plan: पावसाळ्यात करा 'हा' बेस्ट डाएट प्लॅन

Monsoon Diet Plan: पावसाळ्यात करा ‘हा’ बेस्ट डाएट प्लॅन

Subscribe

पावसाळ्यात साथीचे आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे या ऋतूत हेल्दी राहण्यासाठी लाइफस्टाइलमध्ये थोडा बदल केला पाहिजे. कारण यावेळी आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा कमकुवत होते. हेच कारण आहे की, पावसाळ्यात खाण्यापिण्याकडे सावधगिरी बाळगली पाहिजे. अशातच तज्ञ पावसाळ्यातील डाएट बद्दल काय सांगतात हे जाणून घेऊयात. (Monsoon Diet Plan)

पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी डाएटमध्ये व्हिटॅमिन सी असणारे फूड्स खाल्ले पाहिजेत. पावसाळ्यास सर्दी, खोकला, ताप, लूज मोशन आणि पोटासंबंधित इंन्फ्शेक्शनची समस्या वाढली जाते. काही लोकांना ताप ही येतो. यापासून दूर राहण्यासाठी तुम्ही पोषक तत्त्व युक्त डाएट घेतला पाहिजे. अशातच तुम्ही खुप पाणी सुद्धा प्यायले पाहिजे. जेणेकरुन हाइड्रेट रहाल. सर्वात महत्वाचे म्हणजे लिंबू पाणी, नारळाचे पाणी आणि अॅलोवेरा ज्यूस प्यावा.

- Advertisement -
Monsoon Diet Plan (Photo Credits-Google)
Monsoon Diet Plan (Photo Credits-Google)

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
पावसाळ्यात स्वच्छतेची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. फळं आणि भाज्यांचा वापर करण्यापूर्वी ते हलक्या कोमट पाण्यातून स्वच्छ धुवून घ्याव्यात. तीन तासांपेक्षा अधिक वेळ ठेवलेले खाद्यपदार्थ खाऊ नयेत. केळं, पपई, फ्रेश ज्यूस तुम्ही पिऊ शकता. मात्र स्ट्रिट फूड आणि पाकिट बंद पदार्थ खाणे टाळा. तुमचे हात वारंवार स्वच्छ धुवा.

हेल्दी राहण्यासाठी असा असावा डाएट
ब्रेकफास्टमध्ये डाळी, दही, मुगडाळीचा चीला किंवा फ्रुट चाटचा समावेश करावा. ब्रेकफास्टमध्ये तळलेले पदार्थ खाणे टाळा. लंचमध्ये तुम्ही चपाती. डाळ, भाजी, दही आणि सलाद खावे. फायबर, प्रोटीन, न्युट्रिएंट्स, कार्बोहाइड्रेट आणि विटामिनयुक्त पदार्थांचे सेवन करावेय डिनरमध्ये नेहमीच हलके पदार्थ आणि जे लगेच पचतील असे पदार्थ खावेत. त्यासाठी तुम्ही खिचडी किंवा सूप पिऊ शकता.

- Advertisement -

हेही वाचा- Monsoon: पावसाळ्यात होणाऱ्या ‘या’ आजारांपासून दूर राहण्यासाठी खास टीप्स

- Advertisment -

Manini