Saturday, May 4, 2024
घरमानिनीKitchenMonsoon: पावसाळ्यात बनवा 'हे' हेल्दी चाट

Monsoon: पावसाळ्यात बनवा ‘हे’ हेल्दी चाट

Subscribe

पावसाळ्यातील मजा वेगळीच असते. घराबाहेर पडणारा पाऊस, वाफाळलेला चहा आणि भजी याच्या कॉम्बिनेशनने तुमची संध्याकाळ छान जाते. मात्र पावसाळ्यात तळलेले पदार्थ खाऊ नयेत असा सल्ला दिला जातो. यामुळे आरोग्य बिघडते. अशातच तुम्ही पुढील काही हेल्दी चाट हे यंदाच्या पावसाळ्यात नक्कीच ट्राय करुन पहा.

कॉर्न चाट

- Advertisement -


जर तुम्हाला काही चटपटीत खायचे असेल तर नक्कीच कॉर्न चाट बनवा. यामध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेला कंट्रोल करण्यात मदत करतात. या व्यतिरिक्त पोटासंबंधित समस्या ही यामुळे दूर होतात. पचनाची क्रिया सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठतेची समस्या ही होत नाही.

स्वीट कॉर्न चाट अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. त्यात तुम्हाला केवळ कॉर्न उकडून घेत लाल मिर्ची पावडर, चाट मसाला, मीठ आणि लिंबूचा रस टाकून ती तयार करु शकता. तसेच कांदा, काकडी आणि टोमॅटो सुद्धा त्यात टाकू शकता.

- Advertisement -

काळ्या चण्याचे चाट


काळ्या चण्याचे चाट आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे पाचनक्रिया सुरळीत होते. हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा हे फायदेशीर ठरते. यामध्ये व्हिटॅमिन ए, फॉस्फोरस, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम सारखे पोषक तत्व असतात. चण्यात लोहचे प्रमाण ही उत्तम असते.

चाट बनवण्याठी तुम्ही काळे चणे उकडून घ्या. आपण वरती कॉर्नसाठी जी रेपिसी वापरली ती तुम्ही यासाठी वापरु शकता.

-आलू चाट


आलू चाटमुळे सुद्धा तुमची क्रेविंग दूर होऊ शकते. आलू चाट बनवणे अगदी सोप्पे आहे. यासाठी बटाटा उकडून त्याचे गोलाकार काप करा. यावर तुम्ही चाट मसाला, मीठ, कोथिंबीर, चिली फ्लेक्स, लाल तिखट टाकून चाट तयार करु शकता.

-कुरमुऱ्याची भेळ


कुरमुऱ्याची भेळ सुद्धा तुम्ही हेल्दी चाट म्हणून बनवू शकता. यामुळे तुमची भूक सुद्धा नियंत्रणात राहिल आणि याचा तुम्हाला फायदा सुद्धा होईल.


हेही वाचा- Monsoon recipe : पावसाळ्यात करा कच्या केळ्याची भजी

- Advertisment -

Manini