घरमहाराष्ट्रनाशिकमतदान यंत्र तपासणीवर आता ऑनलाईन ठेवता येणार 'लक्ष'

मतदान यंत्र तपासणीवर आता ऑनलाईन ठेवता येणार ‘लक्ष’

Subscribe

नाशिक : स्थानिक स्वराज्य निवडणुका रखडल्या असताना आता निवडणूक आयोगाने एक वर्ष बाकी असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी जिल्ह्याला तब्बल २० हजार मतदान यंत्र प्राप्त झाले असून, ४ जुलैपासून त्यांचे फर्स्ट लेव्हल चेकिंग सुरू करण्यात आले आहे. १८ जुलै अखेर १९०० मतदान यंत्रांची तपासणी पूर्ण झाली असून १० ऑगस्टपर्यंत ही तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे. या तपासणीसाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले असून विशेष म्हणजे यंदा प्रथमच मतदान यंत्र तपासणी प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध करून दिल्याने आता पदाधिकारी आपल्या मोबाईल वरूनही या तपासणीवर लक्ष ठेऊ शकणार आहेत.

राजकीय पक्षांची निवडणूक तयारी आधीपासूनच सुरू झाली आहे. काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा काढली. सत्तेतील भाजप सरकार विरुद्ध सर्वच विरोधी पक्षांनी एकजूट करण्याचीही सुरुवात केली आहे. राज्यात राजकीय घडामोडी वेगाने घडत असतांना आता सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अनेकदा मतदान यंत्राबाबत शंका उपस्थित केली जाते. त्यामुळे मतदान यंत्राची तपासणी करताना राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांनाही उपस्थित राहण्याबाबत कळविले जाते.

- Advertisement -

मात्र, काही प्रमुख पक्ष वगळता इतर राजकीय पक्षांकडून याबाबत अनास्थाच दिसून येते. याकरीता आता आयोगानेही हायटेक होत ही प्रक्रियाही ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर याकरीता लिंक देण्यात आली असून ज्या कोणत्याही राजकीय पक्षांना मतदान यंत्र तपासणी प्रक्रिया बघावयाची असेल त्यांनी या संकेतस्थळावरील लिंकवर क्लिक केल्यास संबंधितांना ही प्रक्रिया बघता येणे शक्य होणार आहे.

नाशिक जिल्ह्यासाठी बंगळुरूवरून २० हजार मतदान यंत्र प्राप्त झाले आहेत. त्यात ११ हजार ७०१ बॅलेट युनिट, ६ हजार ६२२ कंट्रोल युनिट अन् अंदाजे १० हजार ९७ व्हीव्हीपॅट मशीन प्राप्त झाले आहेत. या मशीनची प्रथमस्तरीय तपासणी ४ जुलैपासून केली करण्यात आली आहे. आजपर्यंत १९०० मशिनची तपासणी पुर्ण झाली आहे. याकरीता १० अभियंत्यांमार्फत दररोज प्रत्येकी १५० याप्रमाणे तपासणी केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -