Monday, May 6, 2024
घरमानिनीHealthऑर्गेनिक सॅनेटरी पॅडचे 'हे' आहेत फायदे

ऑर्गेनिक सॅनेटरी पॅडचे ‘हे’ आहेत फायदे

Subscribe

प्रत्येक महिलांना पीरियड्सच्या सायकल मधून जावे लागते. यावेळी बहुतांश महिला पॅड्सचा वापर करतात. यापूर्वी पीरियड्सदरम्यान कापडाचा वापर केला जायचा. अशातच आता प्लास्टिकच्या सॅनिटरी पॅडला पर्याय म्हणून ऑर्गेनिक सॅनिटरी पॅड्स उपलब्ध झाले आहेत. या पॅड्समुळे महिलांच्या आरोग्याला ही कोणते नुकसान होत नाही. ऑर्गेनिक पॅड्स बद्दल तज्ञ नक्की काय म्हणतात हे जाणून घेऊयात. (Organic sanitary pads)

इंन्फेक्शनचा धोका कमी
पीरियड्सवेळी रक्तस्राव कंट्रोल करण्यासाठी आपण रेग्युरल पॅड्सचा वापर करतो. मात्र यामुळे महिलांना खाज, जळजळ आणि इरिटेशन होते. परंतु तुम्ही ऑर्गेनिक सॅनिटरी पॅड्सचा वापर केला तर अशा समस्यांपासून दूर राहू शकता. त्याचसोबत एलर्जीची समस्या ही उद्भवणार नाही.

- Advertisement -

केमिकल फ्री असतात कार्बनिक पॅड
केमिकल पॅड्सच्या तुलनेत हे पॅड्स कार्बनिक गोष्टींपासून तयार केलेले असतात. यामध्ये कार्बनिक कापूस आणि अन्य प्लांट बेस्ड फायबरचा पॅड्ससाठी वापर केला जातो. त्याचसोबत हानिकारक केमिकल्स, प्लास्टिक, सेंट किंवा सिंथेटिक फायबरचा वापर केला जात नाही. या व्यतिरिक्त असे पॅड्स त्वचेला नुकसान ही पोहचवत नाहीत. याच्या तुलनेत प्लास्टिक पॅड्स वापरल्यास त्वचेसंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

- Advertisement -

पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून फायदेशीर
रेग्युलर आणि प्लास्टिक पॅड्सच्या तुलनेत पर्यावरणपूरक असे ऑर्गेनिक पॅड्स असतात. याचा वापर केल्यास आजार पसरण्याचा सुद्धा धोका नसतो. ते इकोनॉमिकल असतात. एकदा खरेदी केल्यानंतर तुम्ही ते दीर्घकाळ वापरु शकता. हाइजनिक दृष्ट्या हे पॅड्स फार फायदेशीर असतात. त्यामुळे जर तुम्हाला रेग्युलर पॅड्मुळे समस्या येत असेल तर तुम्ही ऑर्गेनिक पॅड्सचा पर्याय निवडू शकता.


हेही वाचा- ‘या’ कारणामुळे काहींना येतात लेट पीरियड्स

- Advertisment -

Manini