Sunday, April 28, 2024
घरमानिनीHealthमासिक पाळीदरम्यान रक्तदान करणे योग्य की अयोग्य?

मासिक पाळीदरम्यान रक्तदान करणे योग्य की अयोग्य?

Subscribe

रक्तदान हेच श्रेष्ठदान असे म्हटले जाते. त्यानुसार अनेकजण स्वेच्छेने रक्तदान करतात. मात्र, काहीवेळा रक्तदानासंबंधित गैरसमज किंवा चुकीची माहिती रक्तदानात अडथळा ठरू शकते. त्यामुळेच रक्तदानाबाबत अनेकजण जनजागृती करताना आपण पहिले असतील. लोकांना रक्तदानाविषयी अधिक जागरूक करण्यासाठी संपूर्ण जानेवारी महिना ‘रक्तदाता महिना’ म्हणून साजरा केला जातो.

खरे पाहता, महिलांना रक्तदानासंबंधित अनेक प्रश्न असतात. जसे की, प्रेगन्सीदरम्यान, मासिक पाळी किंवा स्तनपान करताना रक्तदान करावे की नाही. जाणून घेऊयात तज्ज्ञांचे यावर काय म्हणणे आहे?

- Advertisement -

Can I give blood? Things every woman should know about donating

मासिक पाळीदरम्यान रक्तदान करणे योग्य की अयोग्य?
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मासिक पाळी दरम्यान तुमच्या रक्तदान करण्याच्या क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही. मात्र, असे असले तरी रक्तदान करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्हाला ‘हेवी ब्लिडींग’ होत असेल तर तुम्ही रक्तदान करणे टाळले पाहिजे. कारण रक्तदान करण्यासाठी शरीरात किंमत १२ ग्राम हिमोग्लोबिन असणे आवश्यक असते. त्याच वेळी हेवी बिल्डिंग झाल्यास रक्तदान केल्यामुळे तुम्हाला हिमोग्लोबिन किंवा लोहाच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. म्हणून या काळात रक्तदान करणे टाळले पाहिजे.

- Advertisement -

प्रेगन्सीनंतर रक्तदान कधी करावे?
प्रेगन्सीनंतर 9 महिन्यांपर्यंत स्त्रीने रक्तदान करणे टाळले पाहिजे. यासोबतच तुम्हाला हे देखील लक्षात ठेवावे लागेल की प्रेगन्सीदरम्यान तुम्हाला ब्लड इन्फेक्शन झाले आहे का, असे झाले असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही रक्तदान करू नये.

स्तनपान करताना रक्तदान करणे कितपत सुरक्षित?
तज्ज्ञांच्या मते, स्तनपानादरम्यान रक्तदान करताना अतिरिक्त सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. सुमारे ५०० कॅलरीज स्तनपान करणारी महिला दररोज खर्च करते. अशा वेळी जर तुम्हाला शारीरिक दृष्ट्या अशक्त वाटत असेल तर तुम्ही रक्तदान करणे टाळले पाहिजे. या सह रक्तदान करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा आणि स्तनपानादरम्यान अ‍ॅनिमियासारख्या समस्यांना तोंड देत असलेल्या महिलांनीही रक्तदान करणे टाळावे.

 


हेही वाचा ; महिलांना ‘या’ कारणांमुळे होते युरीन इन्फेक्शन

 

- Advertisment -

Manini