Sunday, April 28, 2024
घरमानिनीHealthमासिक पाळीचा रंग ठरवतो तुमचं आरोग्य

मासिक पाळीचा रंग ठरवतो तुमचं आरोग्य

Subscribe

मासिक पाळीच्या रंगावरून महिलेच्या शरीरात नक्की काय अडचणी आहेत हे समजून येते.महिला नेहमीच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे जेव्हा अचानक मोठा आजार होतो तेव्हा उशीर झालेला असतो. त्यामुळे आपल्या आरोग्याविषयी महिलांनी सतर्क राहिले पाहिजे.

 

मासिक पाळी दरम्यान बाहेर पडणारा रक्तस्त्राव तुम्हाला वेगळा वाटत आहे का? नक्की असं का होत आहे हेच समजत नसेल. तर हा लेख संपूर्ण वाचा. मासिक पाळीच्या रंगावरून महिलेच्या शरीरात नक्की काय अडचणी आहेत हे समजून येते.महिला नेहमीच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे जेव्हा अचानक मोठा आजार होतो तेव्हा उशीर झालेला असतो. त्यामुळे आपल्या आरोग्याविषयी महिलांनी सतर्क राहिले पाहिजे.

- Advertisement -

दर महिन्याला हार्मोनल बदलांमुळे या रक्ताचा रंग बदलत असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्त्रीआहार कोणता घेते किंवा तिची जीवनशैली कशी आहे सोबतच वय आणि वातावरण यावरही ते अवलंबून असते. संसर्ग, गर्भधारणा आणि काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगामुळे रक्ताचा रंग आणि अनियमित रक्ताच्या गाठी बनू शकतात. त्यामुळे पाळीसंदर्भात योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

मासिक पाळीचा रंग आणि परिणाम

- Advertisement -

गडद लाल रंग काय सांगतो ?

आरोग्यतज्ज्ञांच्या मते गडद लाल रक्त हे तुमच्या निरोगी असण्याचे लक्षण आहे.बऱ्याचदा गडद लाल रंग हा भीती दर्शवतो . अनेक गैरसमज सुद्धा मनात येतात. पण जर तुमचे रक्त लाल भडक रंगाचे असेल तर याचा अर्थ ते पूर्णपणे ताजे आहे. या रंगाचे रक्त तुमच्या मासिक पाळीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसू शकते, जेव्हा तुम्हाला जास्त रक्तस्त्राव होतो.पण यामध्ये घाबरून जाऊ नका.

लाल किंवा तपकिरी रंग काय दर्शवतात ?

तज्ञ म्हणतात कि तपकिरी रंगाचे रक्त मासिक पाळीच्या सुरुवातीला किंवा शेवटी येते. हे सूचित करते की तुमचे रक्त जुने झाले आहे. त्यामुळे या रंगाचा रक्तस्त्राव झाल्यास काही काळजी करण्याची गरज नसते.

गुलाबी रंग सुद्धा असतो.

एखाद्या महिलेला असे वाटत असेल की तिच्या मासिक पाळीच्या रक्ताचा रंग गुलाबी आहे, तर तिच्या रक्तामध्ये गर्भाशयातील ग्रीवाच्या द्रवपदार्थाचा समावेश होण्याची शक्यता असू शकते. जर तुमचा प्रवाह सामान्यपेक्षा हलका असेल तर, इस्ट्रोजेन पातळीचे कारण असू शकते.

काळा रंग काय दर्शवतो ?

दीर्घकाळानंतर जर पाळी आली असेल तर बऱ्याचदा रक्तस्त्राव काळ्या रंगाचा होऊ लागतो.जास्तदिवसाचे असल्याने ते अधिक ऑक्सिडाइज्ड असते. हे सहसा ज्या स्त्रियांना मासिक पाळी नियमित येत नाही त्यांच्यामध्ये दिसून येते. मासिक पाळी महिन्याला येत नसेल तर गर्भाशयात रक्तस्त्राव साचला जातो आणि जेव्हा ते बाहेर येते तेव्हा त्याचा रंग काळा होतो.

केशरी रंग असेल तर काळजी घ्या .

तुम्हाला योनिमार्गाचे संक्रमण, लैंगिक संक्रमित संसर्ग (STI) किंवा इतर काही बॅक्टेरियाचे संक्रमण असल्यास मासिक पाळी दरम्यान केशरी किंवा नारंगी रंगाचे रक्त दिसू शकते. यावेळी तुम्हाला एक विचित्र वास सुद्धा जाणवू शकतो. असे झाल्यास तुम्ही तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसार तुमचे उपचार करा.

राखाडी

डॉक्टरांच्या मते, जर तुमच्या योनीतून या रंगाचे रक्त येत असेल तर ते तुम्हाला संसर्ग झाला असण्याचे लक्षण आहे. म्हणून तुम्ही ताबडतोब आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञांशी भेटीची वेळ निश्चित केली पाहिजे आणि त्वरित उपचार सुरू करावे.

हे होते पाळीतील रक्ताचे रंग ज्यामुळे महिलांना त्या अडचणीत असतील तर कळायला मदत होऊ शकते.

हेही वाचा :‘या’ योगासनांमुळे sex life राहील healthy

- Advertisment -

Manini