Monday, April 15, 2024
घरमानिनीHealthपिरियडनंतरही ओटी पोट दुखतंय?

पिरियडनंतरही ओटी पोट दुखतंय?

Subscribe

पिरियड दरम्यान स्त्रियांना पोट दुखणे, कंबरेत क्रॅम्प्स येणे, मूड बदलणे, थकवा जाणवणे या समस्या जाणवतात. पण, जर तुम्हाला पिरियडनंतरही ही लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही पोस्ट मेन्स्ट्रुअल सिंड्रोमचे बळी ठरल्या आहेत असे समजा. म्हणजे तुमचे पिरियडनंतरही ओटी पोट दुखते. शरीरातील हार्मोनल असंतुलनासह अनेक कारणामुळे ही समस्या वाढू लागते. जाणून घेउयात पिरिएडनंतरचा सिंड्रोम आणि त्याचा सामना कसा करायचा?

पोस्ट पिरियड सिंड्रोम म्हणजे काय?
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पिरिएडनंतर शरीरात इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सची लेवल वाढल्यामुळे पोस्ट मेन्स्ट्रुअल सिंड्रोमचा धोका वाढू लागतो. काही महिलांना पिरिएडनंतरही पाठदुखी, पोटदुखी, लैगिक वेदना यातून जावे लागते. तर काही स्त्रियांना स्ट्रेसची समस्या प्रामुख्याने जाणवते.

- Advertisement -

पिरिएडनंतरच्या सिंड्रोमची कारणे –

हार्मोनल इम्बॅलन्स –
पिरिएडमध्ये स्त्रियांचे हार्मोन वाढतात आणि कमी होतात. पिरिएडमध्ये शरीरात इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी वाढू लागते. परिणामी, स्त्रियांना पिरिएडनतरच्या सिंड्रोमची समस्या भेडसावू शकते.

- Advertisement -

हिमोग्लोबिनची कमतरता –
शरीरातील रक्त कमी झाल्यामुळे शरीरात अशक्तपणा जाणवू लागतो. शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाल्यामुळे वागण्यात चिडचिडेपणा वाढतो. जे चिंता आणि मूड बदलण्याचे कारण ठरते.

यावर कोणते उपाय कराल?

1. पोषणयुक्त आहार करा –

पिरिएडमध्ये रक्त कमी झाल्यामुळे एनर्जी लेवल कमी होऊ शकते. ज्याने थकवा, अशक्तपणा आणि स्ट्रेस वाढू लागतो. त्यामुळे या दिवसात पोषणयुक्त आहार घ्या.

2. फिझिकल अ‍ॅक्टिव्हिटी करा –

शरीरातील वाढते हार्मोनल इम्बॅलन्स दूर करण्यासाठी शरीराला शारीरिकदृष्ट्या अ‍ॅक्टिव्ह ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे या दिवसात तुम्ही हलका व्यायाम करू शकता.

3. पूर्ण झोप घेणे –

रक्तस्त्राव आणि ओटी पोटदुखीमुळे झोपेत व्यत्यय येतो. अशावेळी पूर्ण झोप घेण्याचा प्रयन्त करा.

 

 


हेही वाचा ; मासिक पाळीदरम्यान रक्तदान करणे योग्य की अयोग्य?

 

- Advertisment -

Manini