Monday, May 13, 2024
घरमानिनीHealthअचानक उभं राहिल्यानंतर चक्कर येण्यामागे 'हे' असू शकते कारण

अचानक उभं राहिल्यानंतर चक्कर येण्यामागे ‘हे’ असू शकते कारण

Subscribe

आपल्यासोबत कधीकधी असे होते की,आपण जेव्हा अचानक उभं राहतो तेव्हा हलकीशी चक्कर आल्यासारखे वाटते. मात्र असे सातत्याने होत असेल तर ही एक गंभीर समस्या असू शकते. अचानक डोकेदुखी, चक्कर येणे अशा लक्षणांमुळे ऑर्थोस्टेटिक हाइपोंटेशन होऊ शकते.

ऑर्थोस्टेटिक हाइपोटेंशन एक प्रकारची लो ब्लड प्रेशरती समस्या आहे. जी तुम्हाला बसल्यानंतर, झोपल्यानंतर अथवा अचानक उठल्यानंतर जाणवते. यामुळेच अचानक चक्कर आल्यासारखे वाटते.

- Advertisement -

ऑर्थेस्टेटिक हाइपोंटेशन म्हणजे काय?
ऑर्थेस्टेटिक हाइपोंटेशन याला पॉस्च्युरल हाइपोंटेशन असे ही म्हटले जाते. ही एक वैद्यकिय स्थिती आहे. त्यात एखादा व्यक्ती बसला किंवा झोपल्यानंतर अचानक उठल्यानंतर जर या स्थितीत जात असेल तर त्याच्या ब्लड प्रेशर अचानक कमी होतो. असे झाल्याने चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे अशी लक्षणे दिसून येऊ शकतात.

When to See a Doctor About Your Headaches | Atlantic Health

- Advertisement -

काय आहेत याची कारणे?
-डिहाइड्रेशन
-औषधं
-वाढते वय
-न्युरोलॉजिकल डिसऑर्डर
-दीर्घकाळ झोपून राहणे

उपचार काय?
-उठताना सावधगिरी बाळगा
जेव्हा तुम्ही बेडवरून उठता तेव्हा अचानक उठण्याऐवजी हळूहळू उठावे. यामुळे तुमच्या ब्लड प्रेशरची स्थिती लगेच बदलणार नाही.

-योगा आणि व्यायाम
सर्वसामान्यपणे योगा आणि व्यायाम केल्याने ही समस्या कमी होऊ शकतो.

-मसाल्यांचे सेवन कमी करावे
आजकाल होणाऱ्या काही समस्यांचे मुख्य कारण आहार असते. त्यामुळे तुमच्या आहारात अधिक मसालेदार पदार्थ असतील तर ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते. तुम्हाला चक्कर येऊ शकते.


हेही वाचा- चालल्यानंतर हात-पाय सूजत असतील तर ‘हा’ असू शकतो आजार

- Advertisment -

Manini