Wednesday, May 15, 2024
घरमानिनीRelationshipलहान सहान गोष्टींवरून रडणाऱ्या मुलाला असे करा हँडल

लहान सहान गोष्टींवरून रडणाऱ्या मुलाला असे करा हँडल

Subscribe

प्रत्येक मुलाची पर्सनालिटी वेगली असते. त्यामुळे सर्वांसोबत एकसारखे डील करणे शक्य नसते. काही मुलं सहज काही गोष्टी शिकतात. पण काहींना वेळ लागतो. अशा प्रकारच्या मुलांची वागणे हे थोडे वेगळे असते. ते अत्यंत शांत स्वभावाचे असतात आणि लहान-सहान गोष्टीवरून रडतात. त्यांना सहज काही गोष्टी कळत नाहीत. अशा प्रकारच्या मुलांना इमोशनली इंटेलिजेंट किड्स असे म्हटले जाते. या स्वभावाच्या मुलांना समजून घेणे आणि हँन्डल करण्यासाठी पालकांना फार कसरत करावी लागते.

मुलांच्या भावनांबद्दल बोला
मुलांना आपल्या भावनांबद्दल काही माहिती नसते. अशातच ते आपल्याला काय वाटते हे मोकळेपणाने सांगू शकत नाहीत. सर्वात प्रथम मुलांच्या भावना समजून घ्या. त्याचसोबत मुलाला आपल्या भावना व्यक्त करण्यास ही सांगा. तुम्ही त्याच्यासोबत फ्रेंन्डच्या नात्याने वागा.

- Advertisement -

Emotional Intelligence: How to Raise a Child with High EQ

मुलं रडायला लागले की शांत रहा
जेव्हा मुलं इमोशनल होऊन आपल्याला काय वाटते हे सांगत असेल आणि तेव्हा रडू लागले तर शांत रहा. त्याचे ऐकून घ्या. मुलाच्या समोर तुम्ही तुमचे इमोशन कंट्रोल करणे अत्यंत गरजेचे असते.

- Advertisement -

शिक्षा किंवा राग व्यक्त करू नका
जर मुलं इमोशनल होऊन रडायला लागल्यास त्यावेळी त्याच्यावर ओरडण्यास सुरु करू नका. त्याचसोबत रागात त्याला शिक्षा ही देऊ नका. त्याऐवजी त्याला समजावून सांगा.

मुलाचे बोलणे ऐका
मुलं तुम्हाला रडतं रडतं काही सांगत असेल तर त्याचे ऐकून घ्या. त्यानंतरच तुम्ही त्याला उत्तर द्या. असे केल्याने मुलाचं लक्ष तुमच्याकडेच राहिल.

प्रश्न जरुर विचारा
मुलाचे बोलणे ऐकून घेतल्यानंतर त्याला प्रश्न जरुर विचारा की, त्याला नक्की काय हवे आहे. त्यावेळी मुलं रडण्याऐवजी त्याला काय वाटते आहे हे सांगू शकेल.


हेही वाचा- प्रसिद्धीसाठी मुलांचा सोशल मीडियावर वापर ठरेल धोकादायक

- Advertisment -

Manini