Tuesday, April 30, 2024
घरमानिनीBeautyHair care : केसांना मेहंदी लावण्याचे 'हे' आहेत फायदे...

Hair care : केसांना मेहंदी लावण्याचे ‘हे’ आहेत फायदे…

Subscribe

मेहंदीचा वापर प्राचीन काळापासून केसांचा नैसर्गिक रंग म्हणून केला जात आहे. मेहंदी हे टॅनिन आणि व्हिटॅमिन ईचे नैसर्गिक स्रोत आहे, जे नैसर्गिकरित्या केसांना मऊ करण्यास मदत करते. इतर कोणत्याही प्रॉडक्ट्सच्या तुलनेत हा सर्वोत्तम हेअर मास्क आहे. मेहंदी लावल्यानंतर केसांना सरसोचे तेल लावा आणि दुसऱ्या दिवशी केसांना शॅम्पू करा. यामुळे केसांमध्ये रंग जास्त काळ टिकेल. केसांना मेहंदी लावण्याचे अनेक फायदे आहेत. कोणते ते जाणून घ्या.

  • केसांना मेहंदी लावल्याने केसांना नैसर्गिक फायदे मिळतात.
  • केसांना नॅचरल चमक येण्यासाठी हर्बल मेहंदी फायदेशीर आहे.
  • मेहंदी हे सर्वोत्तम हेअर मास्क आहे. त्यामुळे महिण्यातून दोनदा तरी केसांना मेहंदी लावावी.
  • केसांना नैसर्गिक एक रंग असतो अशातच जर का तुम्ही केसांना मेहंदी लावली तर त्याला आजून छान रंग येतो.

सफेद बालों में नहीं टिकता मेहंदी और डाई का रंग, अजमाएं ये तरीका, लंबे समय तक काले रहेगें बाल

  • शरीरात असेलेली उष्णता यामुळे सुद्धा केस गळतात यासाठी मेहंदी लावा.
  • मेहंदी तुमच्या केसाला मरून रंग देते तसेच बाहेरच्या रसायन न वापरात हा रंग नॅचरली तुम्हाला मिळतो.
  • जर का तुम्ही हार्ड केमिकल्स केसांना लावलात तर त्याचा परिणाम डायरेक्ट तुमच्या केसांना होतो.
  • मेंदीमध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात ज्यामुळे केसांना पोषण मिळते.
  • जर का तुमच्या केसात कोंडा असेल तर मेंदीच्या वापरामुळे हा कोंडा कमी होईल.
  • केसाला मेहंदी लावताना मेहंदी पावडरमध्ये दही,अंडी मिसळल्यास त्याचा परिणाम केसांना चांगला मिळतो.
  • मेंदी लावल्याने टाळू शांत राहतो. तसेच जर का टाळूला खाज किंवा डॅन्डरफ असेल तर तो सुद्धा निघून जातो.
  • मेहंदी स्काल्पचा pH संतुलित करते आणि केसांना जास्त ऑइली होण्यापासून रोखते.

हेही वाचा : Oily Hair च्या समस्येपासून दूर राहण्यासाठी ‘हे’ फूड्स खाणे टाळा

- Advertisment -

Manini