पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फुट पडलेली नाही. आमच्यापैकी काही लोकांनी एक वेगळा निर्णय घेतलेला आहे, असे वक्तव्य काल गुरुवारी (ता. 24 ऑगस्ट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. ज्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या. पण काल लेकीने केलेल्या वक्तव्याला आज (ता. 25 ऑगस्ट) शरद पवार यांच्याकडून दुजोरा देण्यात आला आहे. अजित पवार आमचेच नेते आहेत, काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणायचे कारण नाही, असे वक्तव्य आज सकाळी बारामती येथे पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे मात्र आता राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार आज (ता. 25 ऑगस्ट) पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांनी फुलांची उधळण करत अजित पवारांचे जंगी स्वागत केले आहे. तर काकांनी म्हणजेच शरद पवारांनी अजित पवार यांना ते आमचेच नेते असल्याचे म्हणत आशीर्वाद दिला आहे.
Photo : पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जंगी स्वागत
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -