Monday, May 6, 2024
घरमानिनीKitchenRecipe : अशी बनवा भरलेली कारली

Recipe : अशी बनवा भरलेली कारली

Subscribe

कारले म्हटले की अनेक जण नाक मुरडतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला खमंग भरलेली कारली कशी बनवायची हे सांगणार आहोत.

साहित्य :

  • 8-10 कारली
  • 2 चमचे दही
  • 1 उकडलेला बटाटा
  • 1 चमचा बडीशेप कोरडी भाजून पूड
  • 1 चमचा धणे जिरे पूड
  • चिमूटभर हळद
  • 1 चमचा तिखट
  • 2-3 चमचा तेल

कृती :

Bharli Karli (Stuffed Bitter Guard) - YouTube

- Advertisement -
  • सर्वप्रथम कारली उभी चिरुन आतून गर काढून घ्यावा. बाहेरुन पण थोडे सोलून घ्यावे.
  • त्यानंतर कारल्याला आतून बाहेरुन मीठ चोळून थोडा वेळ ठेवावे. मग स्वच्छ धुऊन, घट्ट पिळून घ्यावे.
  • नंतर एका उकळत्या पाण्यात कारली घालून काही वेळ वाफवून घ्यावी.
  • मसाले, मीठ दही, उकडलेला बटाटा हे सर्व नीट एकत्र करुन कारल्यामध्ये भरावी.
  • त्यानंतर एका पॅनमध्ये 2-3 चमचा तेल गरम करुन त्यात कारली ठेवावीत.
  • मंद आचेवर सर्व बाजूंनी खरपूस भाजावीत.
  • अशाप्रकारे खमंग भरलेली कारली खाण्यासाठी भाकरीसोबत सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe : कच्च्या पपईपासून बनवा टेस्टी पराठा

- Advertisment -

Manini