घरदेश-विदेशCongress : जयराम रमेश यांनी केलं प्रियंका गांधींबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले- पक्षात...

Congress : जयराम रमेश यांनी केलं प्रियंका गांधींबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले- पक्षात त्यांची…

Subscribe

मीडियाशी संवाद साधताना जयराम रमेश म्हणाले की, इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत खुल्या मनाने चर्चा सुरू आहे. यापुढेही ते जागा वाटपावर चर्चा करत राहतील. तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत प्रियांका गांधी यांच्या भूमिकेबद्दलही ते बोलले. ते म्हणाले की, प्रियांका गांधी या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आहेत आणि त्यांनी आमच्या पक्षात मोठी भूमिका बजावली आहे.

नवी दिल्ली : भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आगामी 2024 निवडणुकीत पराभव करण्यासाठी देशातील जवळपास 28 विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी उघडली आहे. आघाडीत असलेल्या विविध पक्षांमध्ये सध्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असून, याच दरम्यान काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. (Congress Jairam Ramesh made a big statement about Priyanka Gandhi He said in the party his…)

मीडियाशी संवाद साधताना जयराम रमेश म्हणाले की, इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत खुल्या मनाने चर्चा सुरू आहे. यापुढेही ते जागा वाटपावर चर्चा करत राहतील. तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत प्रियांका गांधी यांच्या भूमिकेबद्दलही ते बोलले. ते म्हणाले की, प्रियांका गांधी या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आहेत आणि त्यांनी आमच्या पक्षात मोठी भूमिका बजावली आहे.

- Advertisement -

प्रियांका निवडणुकीत काय भूमिका घेणार?

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांना काँग्रेसमधील अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) प्रभारी पदावरून मुक्त करण्यात आल्यानंतर जयराम रमेश म्हणाले, छत्तीसगड, तेलंगणा, राजस्थान आणि मध्यमधील निवडणूक प्रचारादरम्यान प्रियंका गांधी यांची भूमिका महत्वाची होती. भविष्यातही त्यांची हीच भूमिका असेल, असा आम्हाला विश्वास आहे असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा : Congress पक्ष झाला कंगाल? क्राऊड फंडिंगसाठी ‘डोनेट फॉर देश’ कॅम्पेनची सुरुवात

- Advertisement -

इंडिया आघाडीत काँग्रेसची भूमिका काय?

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, 28 डिसेंबरला नागपुरात ‘है तयार हम’ नावाची मोठी रॅली काढण्यात येणार आहे. या मेळाव्यात काँग्रेस 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. ते म्हणाले की, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेस जागावाटपासाठी तयार असल्याचे स्पष्टपणे सांगितले. ते म्हणाले, इंडिया आघाडी एकसंध आणि मजबूत असावी अशी काँग्रेसची इच्छा आहे. काँग्रेस जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा : Covid-19 JN.1 Variant : मुंबईच्या वेशीवर कोरोनाची जोरदार धडक; ठाण्यात सर्वाधिक रुग्ण

संसदेच्या सुरक्षेबाबत पंतप्रधानांनी बोलावं

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांनी संसदेच्या सुरक्षेतील चुकीबाबत बोलावे अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -