Saturday, April 27, 2024
घरमानिनीKitchenRecipe : टेस्टी मसाला पाव

Recipe : टेस्टी मसाला पाव

Subscribe

बऱ्याचदा नाश्ता काय करावा, असा सर्वच गृहिणींना प्रश्न पडतो. त्यात तो नाश्ता पौष्टिक असणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला खमंग आणि चविष्ट नाश्ता कसा बनवायचा ते सांगणार आहोत.

साहित्य :

  • 4 पाव
  • 2 चमचे बटर
  • 2 चमचे लसूण पेस्ट
  • 1 बारीक चिरलेला कांदा
  • 1 बारीक चिरलेली शिमला मिरची
  • 4 बारीक चिरलेले टोमॅटो
  • 2 चमचे पावभाजी मसाला
  • 2 चमचे लाल तिखट
  • चवीनुसार मीठ

कृती :

Masala Pav

- Advertisement -

 

  • सर्वप्रथम एका पॅनमध्ये दोन चमचा बटर घालून त्यामध्ये लसूण पेस्ट, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, पावभाजी मसाला, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून सर्व एकजीव करुन घ्या.
  • त्यानंतर मसाला पाव तयार करण्यासाठी पावाला बटर लावून ती भाजी पावामध्ये आणि पावावर लावून पाव पुन्हा एकदा परतून घ्या. अशाप्रकारे तयार मसाला पाव सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe : टेस्टी चंपाकळी अशी बनवा

- Advertisment -

Manini