घरक्राइमAI Crime : नवी मुंबईत ‘एआय’चा वापर करून प्राध्यापकाला लाखोचा गंडा

AI Crime : नवी मुंबईत ‘एआय’चा वापर करून प्राध्यापकाला लाखोचा गंडा

Subscribe

नवी मुंबई : नवी मुंबईत ‘एआय’चा वापर करून प्राध्यपकाकडून एक लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणूक झालेली व्यक्ती ही सायन येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक आहे. महाविद्यालयात असताना प्राध्यपकाला  एका आंतरराष्ट्रीय नंबरवरून व्हॉट्सअॅप कॉल आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने आपण ‘सीबीआय’मधून बोलत असल्याचे सांगत फसवणूक केली. ‘एआय’चा वापर करून आरोपीने मुलाचा आवाज मॅच करून प्राध्यपका लाखोचा गंडा घातल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. नवी मुंबईच्या ‘सीवूड’मध्ये ही घटना घडली आहे. (AI Crime Using AI in Navi Mumbai a professor was robbed of lakhs)

हेही वाचा – Ramdas Kadam : उद्धव ठाकरेंसारख्या गद्दाराला धडा शिकवण्याचं काम शिंदेंनी केलं – रामदास कदम

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, प्राध्यपक महाविद्यालयात असताना आरोपीने त्यांना व्हॉट्सअॅप कॉल केला आणि सांगितले की, तुमच्या मुलाला बलात्काराच्या गुन्हात पकडण्यात आले आहे. त्याच्यावरील अटकेची कारवाई टाळण्यासाठी आरोपीने एक लाख रुपयांची मागणई केली. यावेळी आरोपीने प्राध्यपकाला विचार करण्याची संधी न देता तत्काळ निर्णय घेण्यास भाग पाडले. धक्कादायक म्हणाजे प्राध्यपकाला खात्री पटावी यासाठी आरोपीने प्राध्यापकांचे मुलासोबत बोलणेही करून दिले. मुलाचे बोलणे ऐकून घाबरलेल्या प्राध्यपकांनी आरोपीच्या सांगण्यावरून विविध बँक खात्यांमध्ये तब्बल एक लाख रुपये जमा केले. त्यानंतर प्राध्यापकाला आपल्या मुलाची काळजी वाटत असल्याने त्यांनी त्याला फोन केला असता त्यांचा मुलगा घरीच होतो.

हेही वाचा – 

- Advertisement -

Raj Thackeray : महाराष्ट्र एकसंध राहू नये म्हणून…; राज ठाकरेंचे मराठा समाजाला आवाहनप्राध्यपकाच्या लक्षात आले की, आपली फसवणूक झाली आहे. त्यांनी घडलेला सगळा प्रकार आपल्या मुलाला सांगितला. त्यानंतर सायबर पोलिसांकडे घडलेल्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर सायबर पोलीस कामाला लागले असून त्यांनी संबधित मुलाचा आवाज वडिलांना ऐकवण्यासाठी अगोदर बाप मुलाचे फोनवरील बोलणे रेकॉर्ड करण्यात आले होते का? आवाज रेकॉर्ड करण्यासाठी मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर केला गेला का? याचा आता शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -