Saturday, May 4, 2024
घरमानिनीKitchenRecipe: वांग्याचे कुरकुरीत काप रेसिपी

Recipe: वांग्याचे कुरकुरीत काप रेसिपी

Subscribe

वांग्याची भाजी प्रत्येकालाच आवडते असे नाही. त्यामुळे त्याची भजी केली तर ती आवडीने खाल्ली जाते. त्याचसोबत वांग्याचे काप जर तुम्ही कधी खाल्ले नसतील तर कुरकुरीत असे वांग्याचे काप कसे बनवायचे याचीच आज आपण रेसिपी पाहणार आहोत.

What's a cuisine that's not very well-known but worth trying? - Quora

- Advertisement -

साहित्य-
1 लांब काळ्या रंगाचे वांग
1/4 चमचे हळद
1/2 चमचा लाल तिखट
1/4 चमचे गरम मास
1 चमचे बेसन पीठ
1/2 चमचे रवा
1/2 चमचा जिरेपूड
1/2 चमचे धणे पावडर
2 चमचे तेल
1 चमचे कोथिंबीर
मीठ चवीनुसार

वांग्याचे काप (vangyache kaap recipe in marathi) रेसिपी Kavita Ns द्वारे - Cookpad

- Advertisement -

कृती-
-सर्वात प्रथम वांग स्वच्छ धुवून घ्या आणि त्याच्या गोलाकार चकत्या करा. आता एक प्लेट घेऊन त्यात वांग्याचे काप आणि सर्व मसाल्यांसह कोथिंबीर टाका. आता हे सर्व जिन्नस एकत्रित करून घ्या. वांग्याला जो पर्यंत व्यवस्थितीत मसाला लागत नाही तो पर्यंत ते नीट मिक्स करत रहा.

-आता दुसऱ्या प्लेटमध्ये बेसनाचे पीठ आणि रवा घेऊन ते एकत्रित करा. त्यात चिमूटभर मीठ टाका. असे केल्यानंतर मसाल्यातील वांगी या मिश्रणात बुडवा.

-तिसरी स्टेप अशी की, पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्यावर तुम्ही आता वांग्याचे काप टाका. एका बाजूने गोल्डन ब्राउन झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने ही तसेच होऊ द्या. ही रेसिपी करताना लक्षात ठेवा, वांग्याचे काप डिप फ्राय ऐवजी शॅलो फ्राय करायची आहेत. दोन्ही बाजूंनी व्यवस्थितीत वांग्याचे काप शिजल्यानंतर ते एका प्लेटमध्ये खाण्यासाठी काढा. अशा प्रकारे तुमचे कुरकुरीत असे वांग्याचे काप तयार होतील. हे वांग्याचे काप तुम्ही वरण-भात किंवा चपातीसोबत खाऊ शकता.


हेही वाचा- Soup Recipe: काळ्या हरभऱ्याचे हेल्दी सूप

- Advertisment -

Manini