घरक्राइममोखाड्यात अर्चनाचा जीव घेणाऱ्या हल्लेखोराने गळफास घेत स्वत:लाही संपवले

मोखाड्यात अर्चनाचा जीव घेणाऱ्या हल्लेखोराने गळफास घेत स्वत:लाही संपवले

Subscribe

मुंबई : पालघर जिल्ह्यातील मोखाडा शहरात शुक्रवारी भरदिवसा अर्चना उदार (18, रा. पिंपळपाडा) या गभालपाडा आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे एका तरुणाने कोयत्याने गळा चिरून हत्या केल्याने तालुक्यात दहशतीचे वातवरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र, शुक्रवारी सायंकाळीच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले.

हेही वाचा – गडचिरोलीच्या ‘माईनिंग’ उद्योगावरील नियंत्रणासाठी… पालकमंत्रीपदावरून ठाकरे गटाचा शिंदेंवर निशाणा

- Advertisement -

मोखाडा शहरात रयत शिक्षण संस्थेचे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्राथमिक व माध्यमिक गभालपाडा आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत वर्गखोल्या कमी असल्याने या आश्रमशाळेपासून 500 ते 600 मीटर लांब असलेल्या महाविद्यालयात येथील 11वी व 12वीचे विद्यार्थी दररोज चालत जातात. मात्र अशावेळी घोळक्याने किंवा शिक्षक यांच्या सोबत असतात. मात्र शुक्रवारी सकाळी मुली वर्ग संपवून जेवण्यासाठी पुन्हा महाविद्यालयाकडून आश्रमशाळेकडे येत असताना प्रभाकर वाघरे (22) याने हल्ला करून अर्चना उदार हिची हत्या केली. हा सर्व भयंकर प्रकार पाहून तिच्यासोबत असलेल्या मैत्रीणींनी घाबरून आरडाओरडा केला. मात्र, लोक मदतीला धावण्याआधीच आरोपींनी तिथून पळ काढला. पण नंतर त्याने सुद्धा गळफास घेऊन आपले आयुष्य संपवल्याचे समोर आले.

प्राथमिक तपासानुसार ही घटना प्रेम प्रकरणातून झाल्याचा अंदाज आहे. मात्र, या घटनेमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून, शाळेत पाठवून निश्चिंत झालेल्या पालकांची या घटनेमुळे चिंता वाढली आहे. सर्व विद्यार्थी असते किंवा सोबत शिक्षक असते तर ही घटना कदाचित टळली असती. एकूणच या घटनेमुळे भरदिवसा अशी हत्या अशा दुर्गम भागात घडत असेल तर मोखाड्यात गुन्हेगारी वाढल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – थैल्या, आकडा, खोके या शब्दांभोवतीच… ठाकरे गटाचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

ठाण्यातही अल्पवयीन मुलीची झाली होती हत्या

साधारणपणे दीड महिन्यापूर्वी कल्याणमध्या भररस्त्यात एका तरुणाने अल्पवयीन मुलीची चाकूचे वार करत हत्या केली होती. विशेष म्हणजे, कल्याणमधील तीसगाव परिसरात या मुलीच्या आईसमोरच 20 वर्षीय तरुणाने हा जीवघेणा हल्ला केला होता. आकाश कांबळे असे आरोपीचे नाव असून स्थानिकांनी त्याच्या हातातील चाकू हिसकावला आणि त्याला बेदम चोप दिला. नंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -