घरमहाराष्ट्रमोठा बंधू आणि बॉस एकच... बावनकुळेंनी नाकारलं; पण फडणवीसांनी मान्य केलं

मोठा बंधू आणि बॉस एकच… बावनकुळेंनी नाकारलं; पण फडणवीसांनी मान्य केलं

Subscribe

अकोला: महाराष्ट्रात सध्या भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यासोबत सत्तेत आहे. त्यामुळे अनेकदा भाजप सामंजस्याने काही राजकीय बाबींवर बोलताना आपल्याला दिसतो. तसंच, भाजप मोठा भाऊ, बॉस आहे काही त्याग हे करावे लागतात, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. परंतु आज, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप बॉस नाही तर मोठा भाऊ असल्याचं म्हटलं आता यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी म्हटलं की मोठा भाऊ आणि बॉस ही एकच गोष्ट आहे. थोडक्यात काय तर भाजप बॉस आहे हे बावनकुळेंनी नाकारलं परंतु फडणवीस यांनी मात्र होकाराचा सूर मिसळला आहे. अकोल्यात महाआरोग्य शिबिराला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती, यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. (The elder brother and the boss are one and the same Chandrashekhar Bawankule rejected But Devendra Fadnavis agreed )

काय म्हणाले बावनकुळे?

शिंदे गट आणि अजित पवार गट यांना सोबत घेऊन जाताना, भाजप बॉसची की मोठ्या भावाची भूमिका बजावत आहे, असा प्रश्न बावनकुळेंना करण्यात आला होता. यावर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, भाजप हा बॉस नाही तर मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. बावनकुळेंनी असं जरी म्हटलं असलं तरीदेखील फडणवीस यांनी भाजप बॉस असल्याचंच म्हटलं आहे.

- Advertisement -

भाजपच बॉस राहिला पाहिजे

भाजपच बॉस राहिलं पाहिजे, असं वक्तव्य फडणवीसांनी  केलं होतं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आपल्यासोबत असले तरी राज्यात भाजपाच बॉस असला पाहिजे. स्वत:साठी दहा आणि पक्षासाठी 14 तास द्या, असं फडणवीस म्हणाले होते.

सुप्रिया सुळेंनी लगावला टोला

भारतीय जनता पक्ष त्यांच्या मित्रांना कसं वागवतो हे मागची नऊ वर्षे मी दिल्लीत फार जवळून पाहिलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस काही वेगळं बोलले नाहीत, ते बरोबर बोलले आहेत, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांच्या वक्तव्याचं समर्थन केलं. तसंच, भारतीय जनता पक्ष कसा वागतो हे सर्वांना माहिती आहे. परंतु ज्यांना माहिती नाही, त्यांना काय म्हणू मी, असं म्हणत त्यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: ज्याने पक्षाला आणि नेत्यांना उभे केले…, निवडणूक आयोगाच्या सुनावणीवर राष्ट्रवादीतून तीव्र प्रतिक्रिया )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -