Tuesday, May 7, 2024
घरमानिनीनातेसंबंधात या ६ व्यक्ती देऊ शकतात बेस्ट सल्ला

नातेसंबंधात या ६ व्यक्ती देऊ शकतात बेस्ट सल्ला

Subscribe

करियर असो किंवा खासगी आयुष्य उत्तम पद्धतीने जगण्यासाठी आपण आपल्याच मित्रपरिवारातील एखाद्याचा सल्ला घेतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला नव्या व्यक्ती भेटतात. पण त्या सर्वांसोबत अगदी क्लोज होता येत नाही. सर्वच गोष्टी त्यांना सांगता येत नाहीत. अशावेळी नक्की कोणत्या व्यक्तींना आपल्या खासगी गोष्टी सांगितल्या पाहिजेत हे कळले पाहिजेच. पण आयुष्यात जर एखादी समस्या उद्भवल्यास आपल्याला कोण योग्य गाइड करेल हे सुद्धा शोधा. नक्की अशी कोणती माणसं आहेत जी आपल्याला खरंच बेस्ट सल्ला देतील त्याच बद्दल आपण जाणून घेऊयात.

-आई

- Advertisement -


आई ही नेहमीच आपल्या मुलांच्या पाठीमागे उभी असते. तुमच्या पूर्ण आयुष्यभरात ज्या काही समस्या उद्भवतील त्या तुम्ही तिला मनमोकळेपणाने सांगू शकता. अशातच जर तुमचे लग्न झाले असेल आणि तुमचे नवऱ्यासोबत सातत्याने वाद होत असतील तर आईचा सल्ला घ्या. नक्की काय करावे हे तिला विचारा. तुमची आई तुमच्या वैवाहिक आयुष्यातील समस्या समजून घेऊ शकते. दुसऱ्या बाजूला आपल्या आईने तिचा संसार कसा सांभाळला याकडे सुद्धा पहा. परिवारासाठी तिने केलेला त्याग आणि नि: स्वार्थ प्रेम तुम्हाला काही ना काहीतरी जरुर शिकवेल.

-बहिण

- Advertisement -


काही वेळेस असे होते की, अशा काही गोष्ट असतात ज्या आपण थेट आपल्या आई-वडिलांशी शेअर करु शकत नाहीत. परंतु बहिण ही यावेळी तुमच्या कामी येईल. भले तुम्ही तिच्याशी कितीही भांडण करा पण ती तुम्हाला नक्कीच समजून घेईल. तुमच्या वैवाहिक नात्यात अशा काही समस्या उद्भवल्या असतील त्या खरंच आईला सांगता येत नसतील त्या बहिणीला सांगा. तिचा सल्ला घ्या. कारण बहिण तुम्हाला पूर्णपणे ओळखत असते. जर तुमचे चुकत असेल तर ती तुम्हाला तुमची चूक ही दाखवून देईल.

-लग्न झालेले मित्र


जर तुमच्या मित्र-मैत्रिणीचे वैवाहिक आयुष्य आनंदात जात असेल तर ते तुम्हाला नक्कीच योग्य सल्ला देऊ शकतात. जेव्हा तुम्हाला तुमच्या नात्यात सर्वकाही ठिक नाही असे वाटत असेल तर त्यावेळी तुम्ही अशा मित्रांची मदत मागू शकता. वैवाहिक आयुष्याला आनंदित ठेवण्यासंदर्भातील काही गोष्टी ते तुम्हाला जरुर सांगतील. प्रत्येक रडगाणे हे घरातील मंडळींना सांगणे आवश्यक नाही. काही गोष्टी तुम्ही स्वत: सुद्धा समजून घ्यायला पाहिजेत किंवा अशा मित्रांची मदत घेतली पाहिजे.

-सिंगल मित्र-मैत्रीण


गरजेचे नाही की, तुम्ही लग्न झालेल्याच मित्रांचा विचार लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यांचा अनुभव तुम्हाला कामी येऊ शकतो. पण सिंगल मित्र-मैत्रीणीचा सल्ला सुद्धा तुम्हाला मदत करेल. कारण त्यांच्या आयु्ष्यात सुद्धा अशा काही गोष्टी घडल्या असतील किंवा पाहिल्या असतील त्यावरुन ते तुम्हाला समजावू शकतात. आयुष्यात पार्टनर कसे वागतोय हे जेव्हा तुम्ही या मित्राला सांगाल तेव्हा तुमचे मनं हलके होईलच. पण तो जे काही सांगतोय याकडे सुद्धा लक्ष द्या.

-घटस्फोट झालेला मित्र

तुम्ही आता असा विचार कराल ज्याला स्वत:चे नाते टिकवता आले नाही तो काय सल्ला देणार. पण असे नाही. असा मित्र तुम्हाला सल्लाच नव्हे तर त्याचे तुटलेल्या नात्यावरुन तुम्हाला काहीतरी शिकता येईल. जसे की, पार्टनरला ग्रँन्टेड धरणे, नात्यात इमानदारीने पाहणे, पैशांवरुन वारंवार वाद घालू नये. ज्या नात्यात या सर्व गोष्टी नसतात ते नाते कालांतराने मोडते. तर घटस्फोट झालेल्या मित्र-मैत्रिणीने त्यांच्या वैवाहिक काय समस्यांचा सामना केलाय हे जेव्हा तुम्ही जाणून घ्याल तेव्हा तुम्हाला तुमचे नाते कोणत्या स्थितीत आहे हे कळेल. नात्यासंदर्भातील निर्णय हा घाईत घेऊ नये. विचारपूर्वक निर्णय जरुर घ्या.


हेही वाचा- आनंदी राहण्यासाठी स्वत:सह पार्टनरला ठेवा खुश

- Advertisment -

Manini