Monday, May 6, 2024
घरमानिनीRelationshipपार्टनर खोटं बोलतोय का 'या' ट्रिक्सने ओळखा

पार्टनर खोटं बोलतोय का ‘या’ ट्रिक्सने ओळखा

Subscribe

खोटं बोलणे आणि खोटं बोललेले पकडणे या दोन्ही कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत. एखाद्या व्यक्तीला जर व्यवस्थितीत खोटं बोलता येत नसेल तर त्याच्यासाठी असे करणे फार मुश्किलीचे काम असते. ते खोटं बोलत आहेत हे पटकन कळून येते. अशातच तुमचा पार्टनर सुद्धा तुमच्याशी खोटं बोलत असेल तर नक्की कसं ओळखायचे याच बद्दलच्या काही ट्रिक आपण पाहणार आहोत.

-तुमच्या नजरेला नजर न मिळवणे
जर एखादा खोटं बोलत असेल तर तो तुमच्या नजरेला नजर मिळवणार नाही. काही वेळेस लोक ही गोष्ट फार वेळा करतात. त्यामुळे तुम्ही पार्टनरला एखाद्या गोष्टीबद्दल विचारले आणि तो तुमच्याकडे पाहून तुम्हाला उत्तर देत नसेल तर समजून जा तो खोटं बोलतोय.

- Advertisement -

-हावभाव बदलणे
काही वेळेस लोक खोटं बोलताना अशा काही गोष्टी करतात ज्या ते सर्वसामान्यपणे करत नाहीत. उदाहरणार्थ, एखाद्या गंभीर विषयाबद्दल कॅज्युअल हावभाव ठेवणे. म्हणजेच दररोज जसे वागतो त्याच्या उलट वागणे.

- Advertisement -

-बोलणे टाळणे
पार्टनर काही वेळेस तुमच्यासोबत काही गोष्टींवर बोलणे टाळू शकतो. मात्र एखादा गंभीर विषय असेल त्यावर तो बोलणे टाळत असेल आणि त्यासाठी विविध कारणे देत असेल तर तो त्या संबंधित खोटं बोलण्याचा प्रयत्न करतोय.

– स्थितीपासून दूर पळणे
बहुतांश महिलांची अशी तक्रार असते की, पार्टनर त्यांच्यासाठी वेळ काढत नाहीयं. मात्र जर एखादा अचानक व्यस्त झाला किंवा अचानक तुमच्यासाठी वेळ काढणे बंद केले तर असे असू शकते की, तो तुमच्याशी खोटं बोलतोय.

-एकाद्या घटनेबद्दल विविध उत्तर देणे
जर पार्टनर एखाद्या घटनेबद्दल तुम्हाला विविध उत्तरे देत असेल तर समजून जा की, तो त्या घटनेबद्दल खोटं बोलत आहे. असे तेव्हा होते जेव्हा ती घटना त्याच्या संबंधित असते किंवा त्यामध्ये काही तथ्य असते.


हेही वाचा- Divorcee पुरुषाबरोबर मैत्री करण्याआधी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

- Advertisment -

Manini