Tuesday, April 30, 2024
घरमानिनीघर स्टाईलमध्ये सजवायचे आहे, 'या' टिप्स करा फॉलो

घर स्टाईलमध्ये सजवायचे आहे, ‘या’ टिप्स करा फॉलो

Subscribe

आपल्यापैकी अनेकांचा असा गैरसमज आहे की ‘घराच्या सजावटीच्या टिप्स फक्त मोठ्या घरांसाठीच उपयुक्त असतात, छोट्या घरात घराची सजावट शक्य नसते.’ आपलं घर छोटं असो वा मोठं, ते आपल्या आयुष्याचा सर्वात अविभाज्य आणि जवळचा भाग असतो. आपले घर सुंदर आणि आकर्षक दिसावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि त्यासाठी जागेचा आकार कधीच अडथळा नसतो. सजावटीच्या विविध नवनवीन कल्पना, साहित्याची चांगली निवड, आकर्षक रंग, प्रकाशयोजना आणि चांगल्या प्रकारे वापरलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या घराचे स्वरूप बदलू शकते. पण घराचा लूक चांगला आणि मोठा दिसावा म्हणून कोणत्या वस्तू कुठे ठेवाव्यात हेच समजत नाही तेव्हा सर्वात मोठी समस्या उद्भवते. अशा परिस्थितीत काही टिप्स फाॅलो केल्या तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घर सजवू शकता.

फर्निचर

पोर्टेबल अशा फर्निचरची निवड करु शकता याशिवाय, फर्निचरला कमी जागा असावी आणि बाजू नसावी याची विशेष काळजी घ्या. तुमची लिव्हिंग रूम मोठी दिसण्यासाठी तुम्ही कमी जागा व्यापणारे फोल्डिंग फर्निचर ठेवू शकता आणि आवश्यकतेनुसार वापरल्यानंतर ते फोल्ड करू शकता. विंटेज फर्निचर तुम्ही घर सजवण्यासाठी वापरू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या फर्निचरला रंगीबेरंगी रंगही देऊ शकता. यामुळे तुमच्या घराला वेगळा लुक येऊ शकतो.

- Advertisement -

सजावटीच्या वस्तू

जागा घेणाऱ्या सजावटीच्या वस्तू ठेवण्याऐवजी हँगिंग शोकेस ठेवा. तुम्ही तुमच्या लिव्हिंग रूमला पडदे, छत, हँगिंग वॉल आर्टने सजवू शकता . या सर्व गोष्टींव्यतिरिक्त, तुम्ही लिव्हिंग रूमला खिडकीच्या फ्रेम्सने देखील सजवू शकता, यामुळे खोलीचे सौंदर्य वाढेल.

सजावटीत घराच्या भिंती

घराच्या सजावटीत घराच्या भिंतींची सजावट चांगली व्हायला हवी. अशा परिस्थितीत घर सजवण्यासाठी तुम्ही वॉल पेपरचा वापर करू शकता. जर तुम्हाला रंगीबेरंगी सजावट आवडत असेल तर तुम्ही रंगीत वॉल पेपर वापरा. जर तुम्हाला साधी सजावट आवडत असेल तर तुम्ही साधे वॉल पेपर वापरू शकता.

- Advertisement -

घराचे पडदे

घराच्या सजावटीत पडदे आणि कुशन कव्हर्सची सजावटही महत्त्वाची भूमिका बजावते. अशा परिस्थितीत फ्लोरल प्रिंट किंवा अॅबस्ट्रॅक्ट प्रिंट असलेले पडदे वापरावेत. याशिवाय कलरफुल कुशन कव्हर्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत, त्यामुळे तुम्ही तुमचे घर सजवण्यासाठी त्यांचा वापर करू शकता.

रंगांचा योग्य वापर

छोट्या जागेसाठी गडद रंग वापरल्याने जागा लहान आणि गडद दिसते. त्यामुळे गडद रंगांऐवजी हलके आणि तटस्थ रंग वापरणे चांगले. हलके रंग लहान जागा उजळण्यास देखील मदत करतात. तसेच, ते तुमची जागा आहे त्यापेक्षा मोठी दिसण्यास मदत करू शकते. पॅटर्न, कलर ब्लॉकिंग आणि कलर कॉम्बिनेशन पर्याय यामध्ये आणखी मदत करू शकतात. योग्य रंग तुमची जागा अधिक हवादार आणि चमकदार बनवतात.

पेंटिंग्ज आणि वॉल हँगिंग्ज

कोणतीही पेंटिंग किंवा तुमचे फोटो तुमची खोली नेहमी आकर्षक बनवतात. यासाठी तुम्ही वेगवेगळ्या आकाराच्या फ्रेम्स आणि वॉल हँगिंग्ज वापरू शकता.

बेडला रॉयल लूक

तुमच्या बेडला रॉयल लूक किंवा कोणत्याही प्रकारचा थीम लुक देण्यासाठी बेडवर वेगवेगळ्या प्रकारच्या लहान आणि मोठ्या आकाराच्या उशा आणि कुशन वापरा. तुम्हाला रॉयल लुक हवा असेल तर बेडशीट, उशा आणि एकाच रंगाचे पडदे वापरा, तर वायब्रंट थीम हवी असेल तर कलरफुल प्रिंट्स वापरा.

घराची शोभा वाढवणाऱ्या वनस्पती

बाजारात अनेक वनस्पती उपलब्ध आहेत ज्यांचा वापर तुम्ही तुमच्या घरात सजावट म्हणून करू शकता. यासाठी तुम्ही सुंदर भांडे किंवा काचेचे भांडे देखील वापरू शकता. ज्यामुळे ते तुमच्या घराची शोभा वाढवतील.

- Advertisment -

Manini