Monday, May 6, 2024
घरमानिनीउन्हाळ्यात होम डेकोर करण्यासाठी टिप्स

उन्हाळ्यात होम डेकोर करण्यासाठी टिप्स

Subscribe

उन्हाळयात घर थंड राहण्यासाठी आपण विविध उपाय करतो. उन्हाळयाच्या दिवसात तापमान वाढते, त्यामुळे उन्हाळयाच्या महिन्यात, तुमचे घर थंड आणि आरामदायी ठेवणे गरजेचे असते. अगदी सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही घर हवेशीर आणि थंड ठेऊ शकता. तुमच्या बेडशीट बदलांपासून ते खिडकीच्या पडद्यांपर्यतच्या लहान बदलांमुळे मोठा फरक पडू शकतो.

कार्पेट काढा –
थंडीच्या दिवसात फरशी खूप थंड असते. त्यामुळे हिवाळ्यात फरशी आपण कार्पेटने झाकतो. हेच कार्पेट तुम्ही उन्हाळा सुरु झाले की, काढायला हवे.

- Advertisement -

पडद्यांनी नवीन रूप द्या –
उन्हाळ्यात घर थंड ठेवायची गरज असते. ज्याने आपले उष्णतेच्या प्रभावापासून संरक्षण होऊ शकते. हलक्या रंगाच्या आणि हलक्या कापडाचे पडदे तुम्ही लावू लावू शकता. पडद्यांसाठी कॉटन किंवा तागाचे श्वास घेण्यायोग्य फॅब्रिक निवडा.

- Advertisement -

हँगिंग प्लांट्स –
जागा ताजी आणि नैसर्गिक दिसण्यासाठी तुमच्या घरात हँगिंग प्लांट्स जरूर लावा. बाल्कनीत अथवा खिडकीतही तुम्ही झाडे लावू शकता. याने घरातील हवा खेळती राहून वातावरण थंड राहील.

भितींना हलक्या रंगाने रंगवा –
उन्हाळ्यात घरातील भिंती हलक्या रंगाने रंगवा. यासाठी पेस्टल किंवा पांढरा हे ऑप्शन बेस्ट आहेत. हे रंग सूर्यप्रकाश आणि उष्णता अधिक प्रमाणात परावर्तित करतात. एक लक्षात घ्या, फिकट शेड्स वातावरण थंड करण्याचे काम करतात. उन्हाळ्यात उष्णता शोषून घेणारे गडद रंग टाळा.

विंडो फ्लिम्स किंवा शेड्स वापरा –
विंडो फ्लिम किंवा रिफ्लेक्टिव्ह कोटिंगसह शेड्स खिडक्यांमधून तुमच्या घरात येणारी उष्णता लक्षणीयरीत्या कमी होते. या उपायाने तुमच्या खोली थंड राहतील.

आउटडोर शेड निर्माण करा –
तुमच्या घरात डायरेक्ट हिट येऊ नये असे वाटत असेल तर पर्गोलास किंवा पॅटीओ छत्रीचा वापर करा. खिडकी आणि बाहेरील भागात शेडींग करून तुम्ही उष्णता कमी करू शकता. परिणामी, घरातील वातावरणही थंड होते.

 

 

 


हेही वाचा : सोप्या टिप्सने ‘असा’ करा किचनचा मेकओव्हर

- Advertisment -

Manini