घरलाईफस्टाईलHoli 2024 : घरच्या घरी सेलिब्रेट करा होळी

Holi 2024 : घरच्या घरी सेलिब्रेट करा होळी

Subscribe

होळीसाठी आपण अनेक ठिकाणी पार्टीला जात असतो तर आपल्या घरीही पार्टी करत असतो. होळीच्या दिवशी मित्रांसोबत रंग खेळण्याची मजा वेगळीच असते. जर तुम्हालाही या होळीमध्ये तुमच्या मित्रपरिवारासाठी तुमच्या घरी होळी साजरी करायची आहे. तर कोणत्याही त्रासाशिवाय तुमच्या घरी होळी पार्टी कशी आयोजित करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींची आवश्यकता असेल आणि त्यासाठी तुम्हाला कशी तयारी करावी लागेल? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. होळी हा रंगांचा सण घरात साजरा करण्यासाठी घराची सजावट अगदी सोप्या पद्धतीने करा. घर सजवायला कदाचित जास्त वेळ नाहीये. पण तरीही या टिप्समुळे पाहुणे तुमची प्रशंसा करताना थकणार नाहीत. काही सोप्या होम डेकोरेशन टिप्स होळीच्या दिवशी तुमच्या घराला चारचाँद लावतील हे नक्की.

घराची सजावट कशी करावी :

​फुलांचा वापर​

होम डेकोरेशनसाठी होळीच्या रंगबेरंगी सणाला रंगबेरंगी फुलांची सजावट करावी. तुमचे घर सकारात्मक दिसते आणि होळीचा जल्लोषही दिसून येतो. तसंच फुलांच्या सुगंधाने घर मोहरून जाते. याशिवाय तुम्ही आर्टिफिशियल फुलांचाही आधार घेऊ शकता.

- Advertisement -

पडदे आणि उशांची कव्हर्स बदला

होळीसाठी घराला वेगळा लुक देण्यासाठी तुम्ही घरातील पडदे आणि उशांची कव्हर्स बदला. होळीच्या सणासाठी फ्लोरल प्रिंट्स, असणारे पडदे निवडा. तसंच सोफा कव्हर्स आणि रंगबेरंगी बेडशीट्सचा वापर करा.

​भिंती सजवा​

होळीच्या सणाला तुम्ही घराच्या भिंती सजविण्यासाठी वॉलपेपरची मदत घेऊ शकता. ऑनलाईन ऑर्डर करू शकता अथवा वेळ नसेल तर स्टोअर्समधून वॉलपेपर्स आणून तुम्ही सजवू शकता.

- Advertisement -

म्यूजिकची व्यवस्था

कोणतीही पार्टी संगीताशिवाय अपूर्ण असते. अशा परिस्थितीत तुम्ही होळी पार्टीसाठी संगीताची व्यवस्था करावी. यासाठी तुम्हाला साउंड बॉक्सची आवश्यकता असेल. तुमची ग्रँड पार्टी होत असेल तर तुम्ही म्युझिक सिस्टम बुक करा. जर तुम्ही घरी पार्टी करत असाल तर तुम्ही होम थिएटर चालवा.

अन्न- पाण्याची व्यवस्ठा

तुम्हाला कोणत्याही त्रासाशिवाय पार्टी आयोजित करायची असेल तर तुम्ही केटरिंग भाड्याने घ्या. त्यांना फक्त तुमच्या जेवणात काय समाविष्ट करायचे हे सांगायचे असते. याशिवाय तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. स्वयंपाकाबरोबरच ते सर्व्ह करण्याचा उद्देशही पूर्ण करते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -